English
साहित्यिक-कवी-गझलकार-कादंबरीकार
White श्वास माणसे कोत्या मनाची संस्कृतीचा फास झाली... अन् खुजी त्रिज्याच त्यांच्या वर्तुळाचा व्यास झाली! संकराने निर्मिलेले ना चवीचे ना गुणाचे... पीक प्राणी माणसाची बेगडी पैदास झाली! रोज गोळ्या औषधांवर धावणारी देहगाडी... भासते ती देखणी पण जिंदगी आभास झाली! नेहमी चर्चेत होता लेखणीचा तो पुजारी... काल जो सत्कार झाला आज बाधा त्यास झाली! रोजच्याला मी ठरवतो ना लिहावे आज काही... शब्दसाठ्याच्या बळावर गझल माझा श्वास झाली! ©जयराम धोंगडे
जयराम धोंगडे
16 Love
White माझ्यापरीने रागलोभाच्या क्षणांना टाळतो माझ्यापरीने... वागणे माझेच मी पडताळतो माझ्यापरीने! दे महागाईस वाढू वाढत्या गर्भाप्रमाणे... रोज डोहाळे तिचे सांभाळतो माझ्यापरीने! नेहमी असते यशाची वाट खडतर जाणतो मी... पण तरीही मी तिला चोखाळतो माझ्यापरीने! केवढी झाली विषारी वासना या माणसांची... ऐकले की क्रौर्य आसू गाळतो माझ्यापरीने! वेदनांनी वेढले आकाश अन् पाताळ सारे... सोसताना ही पिडा ढेपाळतो माझ्यापरीने! ©जयराम धोंगडे
15 Love
White आखणी सारखी या जिवा लागली टोचणी... ना मिटवता मिटे एकही पापणी! संपली एक की येत जाते नवी... सोडवाव्या किती सारख्या अडचणी? पीक गेले उभे वाहुनी रानचे... राहिली काढणी ना अता कापणी! काय आहे सुरू हे कळेना मला... जिंदगीला म्हणू शाप की पर्वणी? जीवना घे परीक्षा भलेही कशी... लागलो मी कराया तशी आखणी! ©जयराम धोंगडे
18 Love
आता कुठे? बोललेले ऐकणे घडते तरी आता कुठे... माणसाचे नेमके अडते तरी आता कुठे? चार दिवसाचा हिवाळा सोसला तर पाहिजे... गोड थंडी एवढी पडते तरी आता कुठे? स्वार्थ धमन्यातील रक्ताहून वाढे सारखा... सर्द ओली प्रीतही जडते तरी आता कुठे? चांगले व्हावे कुणाचे वाटणे झाले कमी.. कुट्ट काळी भावना दडते तरी आता कुठे माय मेली बाप मेला सांत्वना केली तरी... कोरडे काळीजही रडते तरी आता कुठे? मीच केले मीच मोठा सर्व हे माझ्यामुळे... मीपणाचे आवरण झडते तरी आता कुठे? प्रेम झाले आंधळे बहिरे मुके 'जयराम' जी... तेवढे काळीज धडधडते तरी आता कुठे? ©जयराम धोंगडे
17 Love
White मी का व्यथा अन् वेदनांचा मांडतो बाजार मी? नेमका करतो म्हणावा कोणता व्यापार मी? कोणते, कोठे कुणाला प्रेत सांगा बोलले? पण शवाला पाहिल्यावर शोक करतो फार मी? चोळल्यावर मीठ माझ्या सारखे जखमेवरी? होत जातो फार हळवा अन् जरा बेजार मी? भावकीला भावते कोठे तसे होणे भले? सोडतो चिंता जगाची होत जातो पार मी! स्वप्न मोठे पाहणे नाही गुन्हा मी जाणतो... पूर्तता करण्यास होतो कष्ट करण्या स्वार मी! ©जयराम धोंगडे
10 Love
Unsplash गाडगेबाबांची दशसुत्री भुकेल्यास अन्न । तृषितास पाणी ।। मुखी गोड वाणी । असू द्यावी ।।१।। उघड्यांना वस्त्र । बेघरांना छत्र ।। शिक्षणाचे अस्त्र । देते व्हावे ।।२।। अंध पंगू रोगी । पिडले आजारे ।। तया उपचारे । संतुष्टावे ।।३।। बेकारांना काम । द्यावे योग्य दाम ।। अंतरीचा जोम । वाढवावा ।।४।। अनाथांचे वाली । मायेची सावली ।। सांगूनिया गेली । रोखठोक ।।५।। हाच एक धर्म । जाणावे ते वर्म ।। करावे रे कर्म । सदोदीत ।।६।। कर्मयोग धागा । श्री गाडगेबाबा ।। धन्य वाटे अगा । जयरामा ।।७।। ©जयराम धोंगडे
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here