White श्वास माणसे कोत्या मनाची संस्कृतीचा फास झाल | मराठी Shayari

"White श्वास माणसे कोत्या मनाची संस्कृतीचा फास झाली... अन् खुजी त्रिज्याच त्यांच्या वर्तुळाचा व्यास झाली! संकराने निर्मिलेले ना चवीचे ना गुणाचे... पीक प्राणी माणसाची बेगडी पैदास झाली! रोज गोळ्या औषधांवर धावणारी देहगाडी... भासते ती देखणी पण जिंदगी आभास झाली! नेहमी चर्चेत होता लेखणीचा तो पुजारी... काल जो सत्कार झाला आज बाधा त्यास झाली! रोजच्याला मी ठरवतो ना लिहावे आज काही... शब्दसाठ्याच्या बळावर गझल माझा श्वास झाली! ©जयराम धोंगडे"

 White श्वास

माणसे कोत्या मनाची संस्कृतीचा फास झाली...
अन् खुजी त्रिज्याच त्यांच्या वर्तुळाचा व्यास झाली!

संकराने निर्मिलेले ना चवीचे ना गुणाचे...
पीक प्राणी माणसाची बेगडी पैदास झाली!

रोज गोळ्या औषधांवर धावणारी देहगाडी...
भासते ती देखणी पण जिंदगी आभास झाली!

नेहमी चर्चेत होता लेखणीचा तो पुजारी...
काल जो सत्कार झाला आज बाधा त्यास झाली!

रोजच्याला मी ठरवतो ना लिहावे आज काही...
शब्दसाठ्याच्या बळावर गझल माझा श्वास झाली!

©जयराम धोंगडे

White श्वास माणसे कोत्या मनाची संस्कृतीचा फास झाली... अन् खुजी त्रिज्याच त्यांच्या वर्तुळाचा व्यास झाली! संकराने निर्मिलेले ना चवीचे ना गुणाचे... पीक प्राणी माणसाची बेगडी पैदास झाली! रोज गोळ्या औषधांवर धावणारी देहगाडी... भासते ती देखणी पण जिंदगी आभास झाली! नेहमी चर्चेत होता लेखणीचा तो पुजारी... काल जो सत्कार झाला आज बाधा त्यास झाली! रोजच्याला मी ठरवतो ना लिहावे आज काही... शब्दसाठ्याच्या बळावर गझल माझा श्वास झाली! ©जयराम धोंगडे

#sad_shayari

People who shared love close

More like this

Trending Topic