English
साहित्यिक-कवी-गझलकार-कादंबरीकार
White घाणा मी घाण्याच्या बैलावानी फिरतो आहे... तेव्हा कोठे घास सुखाचा मिळतो आहे! घोटामध्ये अपमानाचा सागर प्यालो... माझ्यामधला अगस्त्यी खवळतो आहे! कर्तृत्वाचा बोथट झाला आहे बोरू... माणूस आणि पेपर आता फुटतो आहे! तालसुरांचे उरले नाही देणे घेणे... जो तो आता टाळ आपला कुटतो आहे! येतो आहे वीट मलाही या साऱ्यांचा.. मिटून डोळे जे घडते ते बघतो आहे! ©जयराम धोंगडे
जयराम धोंगडे
15 Love
काल होता आज नाही... लागणे अंदाज नाही! जन्म अन् मृत्यूस काही... कोणता ईलाज नाही! बेभरवसे वाटते सुख... दुःख धोकेबाज नाही! सापडेना मज कुणीही... जो मुळी नाराज नाही! जीवनाचे कर्ज मृत्यू... मुद्दलावर व्याज नाही! ©जयराम धोंगडे
14 Love
शायरी सवत्यासुभ्यामुळे मज दुःखे जरी मिळाली... वाचायला जगाला कादंबरी मिळाली! वाटेत जिंदगीच्या हैराण दुःख करती... शिनभाग घालवाया मज शायरी मिळाली! मुखदर्शनास होतो आलो तुझ्या विठोबा... पाहायला कळस अन् ही पायरी मिळाली! पाऊस ऊन वारा सोशीत राहिल्यावर... देहास कष्टलेल्या या ओसरी मिळाली! राबून घेतल्यावर आली दया धन्याला... झोळीत गोंडराची मग बाजरी मिळाली! ©जयराम धोंगडे
नको मोह माया असूया नको की नको मोह माया... यहीं छोड़ना हैं यहाँ जो कमाया! नको लालसा ती सुखाची जिवाला... दुखोंने दिया है मुझे रोज साया! किती कष्ट करतोस शेतीत भावा... किसीने पुछा क्या भुका है कि खाया! कितीही लिहा चांगले रोजच्याला... बता कौन बोला मुझे खूब भाया? मराठी नि हिंदी किती गोड भाषा... किया प्यार तो फिर नया प्यार पाया! ©जयराम धोंगडे
16 Love
तिलवत् स्निग्धं मनोऽस्तु वाण्यां गुडवन्माधुर्यम् तिलगुडलड्डुकवत् सम्बन्धेऽस्तु सुवृत्तत्त्वम् । अस्तु विचारे शुभसङ्क्रमणं मङ्गलाय यशसे कल्याणी सङ्क्रान्तिरस्तु वः सदाहमाशम्से ॥ ©जयराम धोंगडे
11 Love
प्रवास चुकले तुझे म्हणालो त्याचाच त्रास होता... साधाच राग कारण त्या कारणास होता! चंपा जुई चमेली नकली फुले सजवली... डोळ्यास भावली पण कोठे सुवास होता? बहिऱ्या मुक्यापुढे मी जोशात व्यक्त झालो... देतील दाद कोणी माझा कयास होता! खोटेखरे कळावे जगणे सुखांत व्हावे... ओढीत याच केवळ केला प्रयास होता! आला तसाच गेला कळले कुणास नाही... शापीत जीवनाचा अंतिम प्रवास होता! ©जयराम धोंगडे
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here