आता कुठे? बोललेले ऐकणे घडते तरी आता कुठे... माणसा | मराठी Shayari

"आता कुठे? बोललेले ऐकणे घडते तरी आता कुठे... माणसाचे नेमके अडते तरी आता कुठे? चार दिवसाचा हिवाळा सोसला तर पाहिजे... गोड थंडी एवढी पडते तरी आता कुठे? स्वार्थ धमन्यातील रक्ताहून वाढे सारखा... सर्द ओली प्रीतही जडते तरी आता कुठे? चांगले व्हावे कुणाचे वाटणे झाले कमी..  कुट्ट काळी भावना दडते तरी आता कुठे माय मेली बाप मेला सांत्वना केली तरी... कोरडे काळीजही रडते तरी आता कुठे? मीच केले मीच मोठा सर्व हे माझ्यामुळे... मीपणाचे आवरण झडते तरी आता कुठे? प्रेम झाले आंधळे बहिरे मुके 'जयराम' जी... तेवढे काळीज धडधडते तरी आता कुठे? ©जयराम धोंगडे"

 आता कुठे?

बोललेले ऐकणे घडते तरी आता कुठे...
माणसाचे नेमके अडते तरी आता कुठे?

चार दिवसाचा हिवाळा सोसला तर पाहिजे...
गोड थंडी एवढी पडते तरी आता कुठे?

स्वार्थ धमन्यातील रक्ताहून वाढे सारखा...
सर्द ओली प्रीतही जडते तरी आता कुठे?

चांगले व्हावे कुणाचे वाटणे झाले कमी.. 
कुट्ट काळी भावना दडते तरी आता कुठे

माय मेली बाप मेला सांत्वना केली तरी...
कोरडे काळीजही रडते तरी आता कुठे?

मीच केले मीच मोठा सर्व हे माझ्यामुळे...
मीपणाचे आवरण झडते तरी आता कुठे?

प्रेम झाले आंधळे बहिरे मुके 'जयराम' जी...
तेवढे काळीज धडधडते तरी आता कुठे?

©जयराम धोंगडे

आता कुठे? बोललेले ऐकणे घडते तरी आता कुठे... माणसाचे नेमके अडते तरी आता कुठे? चार दिवसाचा हिवाळा सोसला तर पाहिजे... गोड थंडी एवढी पडते तरी आता कुठे? स्वार्थ धमन्यातील रक्ताहून वाढे सारखा... सर्द ओली प्रीतही जडते तरी आता कुठे? चांगले व्हावे कुणाचे वाटणे झाले कमी..  कुट्ट काळी भावना दडते तरी आता कुठे माय मेली बाप मेला सांत्वना केली तरी... कोरडे काळीजही रडते तरी आता कुठे? मीच केले मीच मोठा सर्व हे माझ्यामुळे... मीपणाचे आवरण झडते तरी आता कुठे? प्रेम झाले आंधळे बहिरे मुके 'जयराम' जी... तेवढे काळीज धडधडते तरी आता कुठे? ©जयराम धोंगडे

#Winter

People who shared love close

More like this

Trending Topic