Unsplash
गाडगेबाबांची दशसुत्री
भुकेल्यास अन्न । तृषितास पाणी ।।
मुखी गोड वाणी । असू द्यावी ।।१।।
उघड्यांना वस्त्र । बेघरांना छत्र ।।
शिक्षणाचे अस्त्र । देते व्हावे ।।२।।
अंध पंगू रोगी । पिडले आजारे ।।
तया उपचारे । संतुष्टावे ।।३।।
बेकारांना काम । द्यावे योग्य दाम ।।
अंतरीचा जोम । वाढवावा ।।४।।
अनाथांचे वाली । मायेची सावली ।।
सांगूनिया गेली । रोखठोक ।।५।।
हाच एक धर्म । जाणावे ते वर्म ।।
करावे रे कर्म । सदोदीत ।।६।।
कर्मयोग धागा । श्री गाडगेबाबा ।।
धन्य वाटे अगा । जयरामा ।।७।।
©जयराम धोंगडे