White आखणी
सारखी या जिवा लागली टोचणी...
ना मिटवता मिटे एकही पापणी!
संपली एक की येत जाते नवी...
सोडवाव्या किती सारख्या अडचणी?
पीक गेले उभे वाहुनी रानचे...
राहिली काढणी ना अता कापणी!
काय आहे सुरू हे कळेना मला...
जिंदगीला म्हणू शाप की पर्वणी?
जीवना घे परीक्षा भलेही कशी...
लागलो मी कराया तशी आखणी!
©जयराम धोंगडे
#GoodMorning