White मी
का व्यथा अन् वेदनांचा मांडतो बाजार मी?
नेमका करतो म्हणावा कोणता व्यापार मी?
कोणते, कोठे कुणाला प्रेत सांगा बोलले?
पण शवाला पाहिल्यावर शोक करतो फार मी?
चोळल्यावर मीठ माझ्या सारखे जखमेवरी?
होत जातो फार हळवा अन् जरा बेजार मी?
भावकीला भावते कोठे तसे होणे भले?
सोडतो चिंता जगाची होत जातो पार मी!
स्वप्न मोठे पाहणे नाही गुन्हा मी जाणतो...
पूर्तता करण्यास होतो कष्ट करण्या स्वार मी!
©जयराम धोंगडे
#love_shayari