White माझ्यापरीने
रागलोभाच्या क्षणांना टाळतो माझ्यापरीने...
वागणे माझेच मी पडताळतो माझ्यापरीने!
दे महागाईस वाढू वाढत्या गर्भाप्रमाणे...
रोज डोहाळे तिचे सांभाळतो माझ्यापरीने!
नेहमी असते यशाची वाट खडतर जाणतो मी...
पण तरीही मी तिला चोखाळतो माझ्यापरीने!
केवढी झाली विषारी वासना या माणसांची...
ऐकले की क्रौर्य आसू गाळतो माझ्यापरीने!
वेदनांनी वेढले आकाश अन् पाताळ सारे...
सोसताना ही पिडा ढेपाळतो माझ्यापरीने!
©जयराम धोंगडे
#Sad_Status