Ashwini Mengane

Ashwini Mengane

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीशायरी #sad_shayari  White 

वागते का मला टाळल्यासारखी
रिक्त जागा जरा गाळल्यासारखी

येत गजऱ्यातुनी गंध नाही कसा
वाळका मोगरा माळल्यासारखी

एकदाही कधी पाहिले ना तिने
पण तरी वाटते भाळल्यासारखी

होत नाही कशी भेट माझी तिची
सक्त सारे नियम पाळल्यासारखी

ओल प्रेमातली ती हरवली कुठे
ओलही कोरडी वाळल्यासारखी

प्रीत दोघातील ताणते का अशी
ऐन वनव्यात बघ जाळल्यासारखी

बघ नयन ओलसर भासती का असे
नेहमी आसवे ढाळल्यासारखी

©Ashwini Mengane

#sad_shayari

162 View

#Quotes  प्रेम वरवर का कळेना खोल नाही
जा कुठेही भावनेला मोल नाही


सौ. अश्विनी श्रीहरी मेंगाणे

©Ashwini Mengane

प्रेम वरवर का कळेना खोल नाही जा कुठेही भावनेला मोल नाही सौ. अश्विनी श्रीहरी मेंगाणे ©Ashwini Mengane

92 View

जीवनाचा प्रवास एकट्याने करायचा... सोबतीला हात एकांताचा धरायचा... सौ. अश्विनी श्रीहरी मेंगाणे ©Ashwini Mengane

#Quotes #lonely  जीवनाचा प्रवास
एकट्याने करायचा...
सोबतीला हात
एकांताचा धरायचा...

सौ. अश्विनी श्रीहरी मेंगाणे

©Ashwini Mengane

#lonely एकांत...

17 Love

*कोजागिरी...वर्णसंख्या - ७/९/७/९* कोजागिरीचा चंद्र शारद चांदण रातीला... मधाळ,सुंदरसे लावण्य असे संगतीला...१ केशर, बदामाने सजले दुधाचे हे पात्र... पौर्णिमेच्या चंद्रास घेऊन आली ही रात्र...२ को जागती म्हणत लक्ष्मी येते सर्वांच्या घरी... आशिर्वाद रूपाने देते छान सुखाच्या सरी...३ पौर्णिमेच्या रात्रीचा असामंद मंद प्रकाश... या वातावरणात तारकांनी भरे आकाश...४ गच्चीवर जमुया, कोजागिरी करू साजरी... मसालेदार दुध आज सारे करूया घरी...५ ©Ashwini Mengane

#मराठीकविता #Happy  *कोजागिरी...वर्णसंख्या - ७/९/७/९*

कोजागिरीचा चंद्र
शारद चांदण रातीला... 
मधाळ,सुंदरसे 
लावण्य असे संगतीला...१

केशर, बदामाने
सजले दुधाचे हे पात्र...
पौर्णिमेच्या चंद्रास 
घेऊन आली ही रात्र...२

को जागती म्हणत
लक्ष्मी येते सर्वांच्या घरी...
आशिर्वाद रूपाने 
देते छान सुखाच्या सरी...३

पौर्णिमेच्या रात्रीचा
असामंद मंद प्रकाश...
या वातावरणात
तारकांनी भरे आकाश...४

गच्चीवर जमुया,
कोजागिरी करू साजरी...
मसालेदार दुध
आज सारे करूया घरी...५

©Ashwini Mengane

#Happy

6 Love

सखे आजही आहे रस्ता तोच जुना... ज्यावरी उमटल्या तुझ्या पाऊलखुणा... आश्विनी श्रीहरी मेंगाणे ©Ashwini Mengane

#रस्ता  सखे आजही आहे 
रस्ता तोच जुना...
ज्यावरी उमटल्या
तुझ्या पाऊलखुणा...

आश्विनी श्रीहरी मेंगाणे

©Ashwini Mengane

आई महती सारे पाहती भक्तीभावाने फुले वाहती... सौख्याची आली बसे महाली सर्वांची आई ही महाकाली... वर्णू मी काय अंबा ही माय जोगवा गाते येई पहाय... भोळी मी बाई करते घाई दर्शन देण्या तू ये गं आई... मांडला पाट घातला घाट पुरणपोळी सजले ताट... रुप सुंदर भक्ती सागर तुझा घालतो आम्ही जागर हे नवरंग मन तरंग भक्तीभावाने लागला संग...

#देवीavratri2020  आई महती
सारे पाहती
भक्तीभावाने 
फुले वाहती...

सौख्याची आली
बसे महाली
सर्वांची आई
ही महाकाली...

वर्णू मी काय
अंबा ही माय
जोगवा गाते
येई पहाय...

भोळी मी बाई
करते घाई
दर्शन देण्या
तू ये गं आई...

मांडला पाट
घातला घाट
पुरणपोळी
सजले ताट...

रुप सुंदर
भक्ती सागर
तुझा घालतो
आम्ही जागर

हे नवरंग
मन तरंग
भक्तीभावाने
लागला संग...
Trending Topic