आई महती
सारे पाहती
भक्तीभावाने
फुले वाहती...
सौख्याची आली
बसे महाली
सर्वांची आई
ही महाकाली...
वर्णू मी काय
अंबा ही माय
जोगवा गाते
येई पहाय...
भोळी मी बाई
करते घाई
दर्शन देण्या
तू ये गं आई...
मांडला पाट
घातला घाट
पुरणपोळी
सजले ताट...
रुप सुंदर
भक्ती सागर
तुझा घालतो
आम्ही जागर
हे नवरंग
मन तरंग
भक्तीभावाने
लागला संग...
#n#देवीavratri2020