*कोजागिरी...वर्णसंख्या - ७/९/७/९*
कोजागिरीचा चंद्र
शारद चांदण रातीला...
मधाळ,सुंदरसे
लावण्य असे संगतीला...१
केशर, बदामाने
सजले दुधाचे हे पात्र...
पौर्णिमेच्या चंद्रास
घेऊन आली ही रात्र...२
को जागती म्हणत
लक्ष्मी येते सर्वांच्या घरी...
आशिर्वाद रूपाने
देते छान सुखाच्या सरी...३
पौर्णिमेच्या रात्रीचा
असामंद मंद प्रकाश...
या वातावरणात
तारकांनी भरे आकाश...४
गच्चीवर जमुया,
कोजागिरी करू साजरी...
मसालेदार दुध
आज सारे करूया घरी...५
©Ashwini Mengane
#Happy