White
वागते का मला टाळल्यासारखी
रिक्त जागा जरा गाळल्यासारखी
येत गजऱ्यातुनी गंध नाही कसा
वाळका मोगरा माळल्यासारखी
एकदाही कधी पाहिले ना तिने
पण तरी वाटते भाळल्यासारखी
होत नाही कशी भेट माझी तिची
सक्त सारे नियम पाळल्यासारखी
ओल प्रेमातली ती हरवली कुठे
ओलही कोरडी वाळल्यासारखी
प्रीत दोघातील ताणते का अशी
ऐन वनव्यात बघ जाळल्यासारखी
बघ नयन ओलसर भासती का असे
नेहमी आसवे ढाळल्यासारखी
©Ashwini Mengane
#sad_shayari