दुःख
पाचवीला दुःख पुजले, वाटतो मी त्यास चेला...
काय देतो त्रास दुःखा, जीव झाला अर्धमेला!
वाटले मज जे जवळचे, तेच होते घातकी अन् ..
गोड बातांनी तयांच्या, शेवटी बघ घात केला!
केवढी ती हाव होती धावला जीवनभरी तू...
सोडली पुंजी इथे अन् देह रातोरात गेला!
पतप्रतिष्ठा मान मोठा कर्म देते माणसाला..
लाचखोरी घाव वर्मी, का असेना गाजलेला!
रास मोठी लागलेली गंध सारा आसमंती..
नासवाया तो पुरेसा, एक आंबा नासलेला!
जयराम धोंगडे, नांदेड
©Jairam Dhongade
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here