shailesh bade

shailesh bade

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीकविता #Holi  रंगात रंगूया
होळी उत्सवात नाहुया
जाळून दुःख सारी
नवी सुरवात करूया

रंग प्रेमाचे उधळूया
सप्तरंगांत नाहुया
पुरणपोळीचा आस्वाद घेऊया
गोडवा नात्यांचा वाढवूया

अंधारातुनी तेजाकडे जाऊया
दृष्ट विचारांची राख करूया 
ठेवूनी संस्कृतीचा मान
उत्सव होळीचा साजरा करूया

©shailesh bade

#Holi

243 View

#मराठीसंस्कृति  ram lalla 


जय श्री राम

राजतिलक की  है तैयारियां
सजी हे नगरी अयोध्या
प्राण प्रतिष्ठा की है तैयारियां 
केसरिया रंग में रंगी ये अयोध्या

सरयू तट पर दीप जलाएँ
हर आंगन में खुशियाँ आए
रघुनंदन आए है
हर घर में श्री राम ज्योत जलाएँ

हिमालय की वादियों से
हिंद सागर की लहरों से
एक ही नारा है
रघुनंदन आए है हमारे
प्रभु श्री राम आए है

©shailesh bade

jay shree ram... ram mandir

72 View

#मराठीसंस्कृति #navratri  दसरा

पान आंब्याचे गुंफले तोरणी
चढला साज कणशीचा आज दारी

फुल झेंडूचे विणले माळी
शोभुन दिसे रांगोळी दारोदारी

शस्त्राना ही आले रूप देवत्वाचे
पूजियेले त्यांसी घरोघरी

आपट्याच्या पानाला मुलामा सोनेरी
वाढवे नात्यांचा गोडवा दारोदारी

सण आज दसरा आनंदाचा नाही तोटा
जागवे माणुसकीचा धर्म घरोघरी

©shailesh bade

#navratri

81 View

मैत्री जोडले आहेस नाते मैत्रीचे जरा जपून ठेव चार चौघात टोमणे ऐकण्याची सवय ठेव नसले नाते जरी रक्ताचे तरी हृदयात ठेव चार सल्ले ऐकण्याची तयारी ठेव भेटतील सुखात अनेक थोडे अंतर ठेव उभे राहतील मित्र दुःखात थोडा विश्वास ठेवा वाटेल एकटे जेव्हा सोबत आठवणीची ठेव मिळेल उमेद जगण्याची मनात साठवून ठेव लावले आहेस झाड मैत्रीचे जिवंत ठेव लाभेल सावली सदैव थोडा विश्वास ठेवा येतील वादळे अनेक मातीत जखडून ठेव राहील अभेद्य मैत्री जरा जपून ठेव ©shailesh bade

#मराठीकविता  मैत्री

जोडले आहेस नाते मैत्रीचे जरा जपून ठेव
चार चौघात टोमणे ऐकण्याची सवय ठेव

नसले नाते जरी रक्ताचे तरी हृदयात ठेव
चार सल्ले ऐकण्याची तयारी ठेव

भेटतील सुखात अनेक थोडे अंतर ठेव
उभे राहतील मित्र दुःखात थोडा विश्वास ठेवा

वाटेल एकटे जेव्हा सोबत आठवणीची ठेव
मिळेल उमेद जगण्याची मनात साठवून ठेव

लावले आहेस झाड मैत्रीचे जिवंत ठेव
लाभेल सावली सदैव थोडा विश्वास ठेवा

येतील वादळे अनेक मातीत जखडून ठेव
राहील अभेद्य मैत्री जरा जपून ठेव

©shailesh bade

Marathi Kavita

17 Love

नभ दाटून आले मोसमी वारे वाहिले वसंताचे पान सरले मेघ ऋतु चे आगमन  झाले रिमझिम सरीत भिजले अंगणी मोर नाचु लागले चातकाचे प्राण सुखावले मेघ ऋतु चे आगमन झाले थेंबा थेंबातुन भिजले गंध मातीचे दरवळून गेले इंद्रधनू नभात दाटले मेघ ऋतु चे आगमन झाले बीज अंकुर पेरले ओल्या मातीच्या कुशीत रुजले हिरव्या शालूत सजले मेघ ऋतु चे आगमन झाले ©shailesh bade

#मराठीकविता  नभ दाटून आले 
मोसमी वारे वाहिले
वसंताचे पान सरले 
मेघ ऋतु चे आगमन  झाले 

रिमझिम सरीत भिजले
अंगणी मोर नाचु लागले
चातकाचे प्राण सुखावले
मेघ ऋतु चे आगमन झाले 

थेंबा थेंबातुन भिजले
गंध मातीचे दरवळून गेले
इंद्रधनू नभात दाटले
मेघ ऋतु चे आगमन झाले 

बीज अंकुर पेरले
ओल्या मातीच्या कुशीत रुजले
हिरव्या शालूत सजले
मेघ ऋतु चे आगमन झाले

©shailesh bade

Marathi Kavita

13 Love

मैत्री असावी सुंदर पाण्याहून निर्मळ मैत्री असावी मायळ चंद्राहून शीतल मैत्री असावी मधुर अमृताहुनी गोड मैत्री असावी अतूट नात्याहुन प्रेमळ मैत्री असावी अथांग सागराहुन खोल मैत्री असावी अनंत आकाशगंगेहुन विशाळ मैत्री असावी दीप पणतीतल्या ज्योतीवानी मैत्री असावी तेजस्वी सूर्य किरणावानी मैत्री असावी सुगंधी कस्तुरीचा गंधावानी मौत्री असावी सोनेरी परिसाच्या रूपावानी मैत्री असावी प्रेमळ मायेच्या ममतेवानी मैत्री असावी निस्वार्थी कृष्ण सुदामावानी ©shailesh bade

#मराठीकविता #nightsky  मैत्री असावी सुंदर पाण्याहून निर्मळ
मैत्री असावी मायळ चंद्राहून शीतल

मैत्री असावी मधुर अमृताहुनी गोड
मैत्री असावी अतूट नात्याहुन प्रेमळ

मैत्री असावी अथांग सागराहुन खोल
मैत्री असावी अनंत आकाशगंगेहुन विशाळ

मैत्री असावी दीप पणतीतल्या ज्योतीवानी
मैत्री असावी तेजस्वी सूर्य किरणावानी

मैत्री असावी सुगंधी कस्तुरीचा गंधावानी
मौत्री असावी सोनेरी परिसाच्या रूपावानी

मैत्री असावी प्रेमळ मायेच्या ममतेवानी
मैत्री असावी निस्वार्थी कृष्ण सुदामावानी

©shailesh bade

#nightsky

7 Love

Trending Topic