दसरा
पान आंब्याचे गुंफले तोरणी
चढला साज कणशीचा आज दारी
फुल झेंडूचे विणले माळी
शोभुन दिसे रांगोळी दारोदारी
शस्त्राना ही आले रूप देवत्वाचे
पूजियेले त्यांसी घरोघरी
आपट्याच्या पानाला मुलामा सोनेरी
वाढवे नात्यांचा गोडवा दारोदारी
सण आज दसरा आनंदाचा नाही तोटा
जागवे माणुसकीचा धर्म घरोघरी
©shailesh bade
#navratri