मैत्री
जोडले आहेस नाते मैत्रीचे जरा जपून ठेव
चार चौघात टोमणे ऐकण्याची सवय ठेव
नसले नाते जरी रक्ताचे तरी हृदयात ठेव
चार सल्ले ऐकण्याची तयारी ठेव
भेटतील सुखात अनेक थोडे अंतर ठेव
उभे राहतील मित्र दुःखात थोडा विश्वास ठेवा
वाटेल एकटे जेव्हा सोबत आठवणीची ठेव
मिळेल उमेद जगण्याची मनात साठवून ठेव
लावले आहेस झाड मैत्रीचे जिवंत ठेव
लाभेल सावली सदैव थोडा विश्वास ठेवा
येतील वादळे अनेक मातीत जखडून ठेव
राहील अभेद्य मैत्री जरा जपून ठेव
©shailesh bade
Marathi Kavita