नभ दाटून आले
मोसमी वारे वाहिले
वसंताचे पान सरले
मेघ ऋतु चे आगमन झाले
रिमझिम सरीत भिजले
अंगणी मोर नाचु लागले
चातकाचे प्राण सुखावले
मेघ ऋतु चे आगमन झाले
थेंबा थेंबातुन भिजले
गंध मातीचे दरवळून गेले
इंद्रधनू नभात दाटले
मेघ ऋतु चे आगमन झाले
बीज अंकुर पेरले
ओल्या मातीच्या कुशीत रुजले
हिरव्या शालूत सजले
मेघ ऋतु चे आगमन झाले
©shailesh bade
Marathi Kavita