भविष्य त्याच्या हाती, तो निर्माता बालकांचा
म्हणूनच त्याला दिला आपण दर्जा पालकांचा
आठवतो तो दिवस जेव्हा त्याला "आई" म्हटले
काहीतरी होते ज्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटले
घरापेक्षा जास्त वेळ शाळेतच तर असायचो
कधी कधी तर चक्क त्याच्या मांडीवरही बसायचो!
लाडका-दोडका नाही, सगळी त्याचीच मुले होती
त्यानेच गिरवायला शिकवली आम्हा पाटी समानतेची
सण सारे, नवे निराळे, केले नेहमी साजरे
त्याच्यामुळे सजवले आपल्या संस्कृतीचे नजारे
मनोभावे आठवू त्याला, नको कशाची सक्ती
हृदयी माझ्या सदा वसावी त्या गुरूचीच मूर्ती
©Anagha Ukaskar
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here