White *🥔🍆 आलू-वांग्याची भाजी आणि प्रेम! ❤️*
प्रेम म्हणजे नव्हते कधीच महागडे हॉटेल,
ना गुलाबांच्या फुलांनी सजवलेले टेबल...
प्रेम होतं त्या मायेच्या स्वयंपाकघरातून येणारा सुवास,
ज्याला यायचा आलू-वांग्याच्या भाजीचा दरवळ खास!
ती म्हणायची, "आज काय खायचंय का तुला खास?",
मी म्हणायचो, "काहीही चालेल, तू बनवलेलं असलं की बास!"
ती अलगद हसायची, हळूच गोड लाजायची,
मग स्वयंपाकघरात जेवणासाठी एकटीच गुंतून जायची...
त्या चुल्ह्यावर भाजीसारखं प्रेम तिचं शिजवायची,
त्या फोडणीत माया, ममता तिची मिसळायची...
त्या वांग्यात प्रेमाचा गरम मसाला टाकायचा,
त्या आलू सोबत जगण्याचा गहिवर दाटायचा...
कधी मी नाक मुरडायचो, म्हणायचो "आजही वांगं?",
ती म्हणायची, "प्रेम केलं की आवडीनं रोज खावं!"
मग एक घास तोंडात माझ्या ती भरवायची,
त्या वांग्याच्या चवीतही प्रेम तिचं वाढायची...
आजही आलू-वांग्याची भाजी समोर कधी आली,
तर आठवतात तिच्या सोबतचे ते तिखट-गोड क्षण...
कारण प्रेम फाईव्ह स्टारच्या डिशमध्ये कधीच नसतं,
तर ते घरच्या गरम चपाती आणि त्या साध्या भाजीच्या घासात असतं!
❤️ प्रेम म्हणजे आलू-वान्ग्याची भाजी चं नातं,
साधं, पण आयुष्यभर सोबत राहणारं! ❤
काव्यांकुर तो _मयुर सं. लवटे
©मयुर लवटे
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here