White तू मला खूप आवडतेस तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावासा
वाटतो,अस म्हणणारा तो आजकाल आठवणींतच भेटतो
डोळे भरून पहायचय तुला तुलाच डोळ्यांत सामावून घेतो,
अस म्हणणारा तो डोळे भरून आले तरी रोज त्रास नवा देतो....
तुला घट्ट मिठी मारावी वाटते,तुझ्याच कुशीत आल्यावर धीर मला वाटतो,
अस म्हणणारा तो आनंद कोणा दुसऱ्याचाच मिठीचा घेतो....
मी तुझाच होतो ,तुझाच आहे आणि तुझाच राहीन अस म्हणणारा तो न जाणो हेच वाक्य आणखी कोणाकोणाला म्हणतो....
दुराव्यातील प्रेम आणि प्रेमातील दुरावा त्याला कधी कळलाच नाही,किती केलं मी प्रेम त्यावरी पण तो फक्त माझ्याकडे कधी वळलाच नाही....
©Anisha Kiratkarve
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here