नाटक....
जीवन आहे एक न संपणार नाटक,
सगळे लोक असतात याचे पात्र आणि घटक.
नाटक असते एक रंगभूमी,
पण कलाकारांची असते ती कर्मभूमी.
इथे सादर करतात अनेक कला,
प्रश्न व उत्तर यांची मोजली जाते मग तुला.
कलाकार मंडळी करतात अनेक वेशभूषा,
सादरीकरण असे जणू की न संपणाऱ्या वेड्या आशा.
पडद्यामागच्या लोकांची इथे गोष्ट असते वेगळी,
पडदा उघडताच समोर येतात रोज नव्या खेळी.
नाटक आहे सुंदर आयुष्याचे गीत,
शेवटी लोक पाहतात यामध्ये सत्याचीच जीत.
असे हे नाटक कधीही न उलगडणारी कथा,
सगळ्यांच्याच आयुष्याची असते ही व्यथा.
©Mayuri Bhosale
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here