English
जिंदगी.... जिंदगी मे आती है बहुत सारी समस्या हम भी हारेंगे नही करेंगे परिश्रम की कठोर तपस्या मन तो करता है जिंदगी अपने हिसाब से चले लेकिन किसे पता की क्या है पडा किसके गले इम्ताह तो लेती है जिंदगी खूप जादा डटकर सामना करेंगे ये है हमारा वादा पहाडो की चट्टानो जैसी है जिंदगी हमारी छू लेंगे हम बनकर वादियों की सवारी ©Mayuri Bhosale
Mayuri Bhosale
12 Love
🤪🤪 नवऱ्याचे बोलणे कसे बायकोला खुपले....(विनोदी संवाद)🤷😏🫣🤪 नवरा आजकाल मला बोलतो कसा काही नवीन रेसिपी करू नका शांत जरा बसा रोज नवीन डिश खाऊन खाऊन कंटाळा आलाय मला हे सगळं तुझं तेच ते पाहून नवीन रेसिपी करून झाली आहेस खुळी देशील बाई माझा कुठेतरी आता बळी पहिलीच होतीस तशी राहा बरी नाहीतर लोक येऊन विचारतील आहे का ती वेडी घरी तुझ्या रेसिपी तर नाहीत काही खास लावू नकोस जीवघेणा फुकटचा गळ्याला फास रोजच खाऊन नवीन रेसिपी झालेत वांदे रिकाम्या टेकड्या माणसांचे असलेच उद्योगधंदे बघा काही जमतय का नोकरीचे असले नाद सोडून प्रयत्न करा पोटाच्या भाकरीचे ©Mayuri Bhosale
8 Love
सपान... मला पण रोज पडतं बघा एक सपान फिरत राहत मन सारं देश त्यात गप्प गुमान नाय कसली धावपळ नाय कसली घाय डोळा उघडताच पोरं म्हणत्यात अग उठना मांय मला पण वाटतं उंच उंच उडावं मायेच्या ओढीनं लागत मग सारं सोडावं किती बाय घालमेल ती माझ्या या मनाची जाण व्हते मग चुलीवरल्या त्या भाकरीच्या तव्याची लगीन नव्हतं मला पण लवकर करायचं माझा बाप म्हणालो तुला नाही आता ते कोडं उमगायच कोणाला तर कुठे माहित मला काय वाटतं रीत जगाची न्यारी आतला हृदयाचा कोपरा ताडकन तुटतं नाही राहिलं आता बाय मागचं ते दिवस आकाशात जाऊन बायका पण पाडालेत सपनांचा पाऊस असं म्हणत्यात सपान बघावं तर पहाटेच खरंच जगात बायांनी करून दाखवलं चीज कष्टांच सारं काय करायचं या आपल्या घरादारासाठी नको बाय उतार वयात दुःख कुठलं वाटी जगावं वाटतं सारं सोडून कधी कधी सपनातील दुनियेत चिंब भिजलेले मन गुंफत पुन्हा मायेच्या जाळेत मनी करत राहील सदा या सपनातल्या सपनाचा पाठलाग धावीन आता बाय पाहता न भूतकाळ कसला मांग जगाण पण जानाव परतेक जीवाचं असतं एक सपान बघायला मिळंल आशेची पंखात दडलेली वेगळीच उडान ©Mayuri Bhosale
15 Love
White आयुष्य... आयुष्य चालले सारे निसटूनी रिकामा खिसा भरण्यासाठी रात्र दिवस ही समजेना वेळ राहिला फक्त धावण्यासाठी गुंफूनी घेतले आयुष्य सुखात जीवन घालवण्यासाठी हरवून बसलो आहोत नाती चार मोहाच्या क्षणांसाठी हसणे सुद्धा विसरले किंमत होऊनी गेली त्याची शून्य लोकांसाठी नात्यागोत्याची तर परवाच नाही जोडली फक्त मुळी त्या स्वार्थासाठी सामावले जवळच आयुष्याचे गुपित निकट असले तरी गप्प राहण्यासाठी कुणालाच इथे कुणाची पडली नाही स्पर्धा सुरू झाली फक्त जिंकण्यासाठी जो तो धावत आहे सुखासाठी सारीपाटाचा डाव सारा मांडला कोडेच पडले एक जगण्यासाठी...... ©Mayuri Bhosale
14 Love
White रिमझिम पाऊस.... ढग आले दाटूनी आकाशी सुरू झाली त्यांची इकडे तिकडे धावपळ रिमझिम धो धो बरसला पाऊस मोत्यांच्या गारांनी भरली ओंजळ विजांच्या कडकडाटानी नभी चमकुनी मांडला खेळ सांज अंबरी दाटली प्रकाशाची लखलखीत वेळ मनावर उमटली काहीसी अंधाराची छटा निराळी ओढ लागली घरट्याची साद घाली पक्षी त्या कातरवेळी गवताची सुरू झाली जमिनीवरती चुळबूळ मातीच्या त्या गंधाची मनमोहक अलगशी दरवळ टप टप पावसाचा आला गालावरती एक ओघळ सरसर निसटूनी गेला खाली ओल्या आसवांबरोबर घरंगळ लोकांची केली या पावसाने नुसती घाईघाईची पळापळ रस्त्यावरती वाहनांची जमा झाली एकमेकास रेटूनी भली मोठी वर्दळ ©Mayuri Bhosale
11 Love
White घराघरातील वाद विवाद....( बायको vs नवरा ) बायको: मी म्हणून राहिले नवरा: तसे गाली मिश्किल पणे हळूच हसले बायको: मी म्हणूनच फसले नवरा: मी होतो म्हणून सारे काही सोसले बायको: कुठून लग्नाची बुद्धी सुचली नवरा: चुकून तू माझ्या गळ्यात पडली बायको: व्यथा ही माझी कशी कुठे मांडू नवरा: कशाला उगीचच आपण आता भांडू ©Mayuri Bhosale
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here