सपान...
मला पण रोज पडतं बघा एक सपान
फिरत राहत मन सारं देश त्यात गप्प गुमान
नाय कसली धावपळ नाय कसली घाय
डोळा उघडताच पोरं म्हणत्यात अग उठना मांय
मला पण वाटतं उंच उंच उडावं
मायेच्या ओढीनं लागत मग सारं सोडावं
किती बाय घालमेल ती माझ्या या मनाची
जाण व्हते मग चुलीवरल्या त्या भाकरीच्या तव्याची
लगीन नव्हतं मला पण लवकर करायचं
माझा बाप म्हणालो तुला नाही आता ते कोडं उमगायच
कोणाला तर कुठे माहित मला काय वाटतं
रीत जगाची न्यारी आतला हृदयाचा कोपरा ताडकन तुटतं
नाही राहिलं आता बाय मागचं ते दिवस
आकाशात जाऊन बायका पण पाडालेत सपनांचा पाऊस
असं म्हणत्यात सपान बघावं तर पहाटेच
खरंच जगात बायांनी करून दाखवलं चीज कष्टांच
सारं काय करायचं या आपल्या घरादारासाठी
नको बाय उतार वयात दुःख कुठलं वाटी
जगावं वाटतं सारं सोडून कधी कधी सपनातील दुनियेत
चिंब भिजलेले मन गुंफत पुन्हा मायेच्या जाळेत
मनी करत राहील सदा या सपनातल्या सपनाचा पाठलाग
धावीन आता बाय पाहता न भूतकाळ कसला मांग
जगाण पण जानाव परतेक जीवाचं असतं एक सपान
बघायला मिळंल आशेची पंखात दडलेली वेगळीच उडान
©Mayuri Bhosale
सपान