White ©samadhan patil Navale
गेले ते जुने वर्ष आता,
होतोय मनी हर्ष आता ||
दुःखी कष्टी वर्षातुन, सुखद नूतन वर्षाकडे
असत्याकडून सत्याकडे.. गोंधळातून शांतीकडे,
करा तयारी स्वागताची, येणाऱ्या नव्या मित्राची
परंतु जून्या वर्षमित्राचा तिरस्कार कदा न करता
गेले ते जुने वर्ष आता ||
झाले गेले विसरून जाऊ, वर्षभराचे कौतुक पाहु
काय मिळवले किती गमवले याचा मनी हिशेब लावू,
गतवर्षी पासून अनुभव घेऊ, आता आम्ही शहाणे होऊ
संकल्प करुया नववर्षाचा,पीडीतांच्या आम्ही कामी येऊ
करुया सेवा या देशाची,जगता जगता मरता मरता
गेले ते जुने वर्ष आता ||
"नववर्ष सुखाचे जावो" असे सर्वां शुभेच्छा
आपल्या सर्व नित्यकार्या,करत रहा कायावाचा,
होऊ नका देऊ कधी,घात कुणाच्या विश्वासाचा
संकल्प करू अवघे धरू,चरण त्या सत्पुरुषाचे
लोककल्याणासाठी ज्यांनी,रान केले जीवाचे,
गौरवशाली इतिहासाची, पुज्य आपली भारतमाता
गेले ते जुने वर्ष आता, झाला मज हर्ष आता ||
©Samadhan Navale
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here