New Year 2024-25 नवी नवी नवलाई
ओठी आनंदाचे गाणे
नवीन आले हे वर्ष
जाईल का रे सुखाने
एकामागे एक प्रश्न
किती शोधावी उत्तरे
संकटातल्या चाहुलीचे
मागचे ते वर्ष सरे
नववर्षाच्या येण्याने
विश्व अंबरी उजळु दे
सुख समृद्धी आनंदाचे
स्वप्न रंगांनी भरू दे
त्याच त्या आठवणींना
थोडासा विसावा देऊ
नवीन या स्वप्नांनी
उत्तुंग भरारी घेऊ
गतकाळाचा डोई भार
विसरून जाऊ निराशा
रुपरंग नवे नवेसे
नव्याने जागवु आशा
~ विलास भोईर
©Vilas Bhoir
#Newyear2024-25 निरोप समारंभ मराठी कविता मराठी कविता संग्रह मराठी कविता संग्रह मराठी कविता