White कधीकधी निराशेच्या ढगांनी, आशेचे आकाश झाकाळते
तेव्हा विचाराच्या प्रकाशाने अंतर्मन उजळून निघावे,
आणि शब्दांच्या तेजपुंज किरणांनी
निराशेचे ढग आरपार छेदून
कवितारुपी प्रकाशमान पहाट व्हावी.
जरी मग दिवसभर लागले झेलावे चटके,
स्वप्न अपूर्तीचे, निरर्थक वाटणाऱ्या जीवनाचे
तरीही घामाचे रूपांतर कवितेत व्हावे,
नसले प्रभावी पण शब्दात जरी
अथवा न मिळो प्रसिद्धी तरी..
त्या अशक्तपणातही सशक्त असा अर्थ असावा,
प्रत्येक मानवी मनाची असावी गरज..
कविता आणि काव्य
तरीही न होता निखळ मनोरंजन
अनुभवाचाही त्यात परिपाक असावा,
निराशेत-आशेत दुःखात आनंदात
जीवनाच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या वळणावर
जरी शाश्वती नसली जिंकण्याची
जीवनाच्या रणांगणावर,द्वेष, वैैर,मत्सर या आत्मशत्रूंना
तरीही धरून हात कवितेचा, मनी विजयश्रीचा ध्यास धरावा
महत्त्व वर्णिल्याने कदापि होत नाही कमी
तीच तर असते खऱ्या कवितेची हमी
रसिकांची डोळस.. नसते त्यांना कमी
सर्वच असतो आपण रसिक, पण...
मिळत नसते कलात्मक दृष्टी,
तेव्हा शिरून विश्वात कलेच्या, मनाला छंद कवितेचा जडावा
©Samadhan Navale
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here