White महाराष्ट्र ही कर्मभूमी, धर्मभूमी संत महात्म्यांची
महाराष्ट्र ही मातृभूमी इथल्या प्रत्येक मना मनाची
ही युद्धभूमी शूरवीर छत्रपतीच्या छाव्याची
ही माय भूमी मराठीच्या मधुर मायबोलीची
करते ही भूमी पावन ज्ञानोबांची बोली,तुकोबांची गाथा
उत्कृष्ट साहित्य इथले त्यापुढे अभिमानाने झुकवावा माथा
सगळ्यांच्या स्वप्नांची मुंबई,मातीचा गंध जपणारे पुणे
मेट्रोच्या वेगाने पळणारे नागपूर, वा छत्रपती शाहूंचे कोल्हापूर
प्रत्येक शहराची आप आपली छाप आहे वेगळी
प्रत्येकाने जपून ठेवली मराठी संस्कृतीची लागडी
कोकणी,पुणेरी, ऐरणी,वऱ्हाडी हा सगळा माझ्या मराठीचा साज
हिंदी,इंग्रजी पण बोलतो तरी महाराष्ट्र बाळगतो मराठीचा माज
छत्रपतीच्या मातीत व संतांच्या सावलीत मिळाला हा जन्म
याच्यापेक्षा कुठला सुंदर योग नाही,याच्यातच आयुष्याचे मर्म
-रितेश गडम✨
©Ritesh Gadam
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here