Year end 2023 कोरोना आला माणसं मेली कालांतराने विसरले सगळे
प्रेम विवाह झाला मुलंबाळं झाली विसरले सगळे
निवडणुका झाल्या कुणी हरले कुणी जिंकले, वादविवाद गैरसमज झाले
निवडणूक विसरले सगळे
मायबाप मेले मुलं झाले नातू झाले ते दुःख विसरले सगळे
परीक्षा झाल्या पास झाले अभ्यास विसरले सगळे
लिहून झालं डायरी भरली डायरी विसरले सगळे
स्वयंपाक झालं जेवण केलं पोट भरलं भूक विसरले सगळे
प्रेम झालं ब्रेकअप झालं नवीन माणसं भेटली जुन्या प्रेमाला विसरले सगळे
आयुष्य मिळालं दुःख मिळाले सुख विसरले सगळे
जगत आलो लोकं मिळाले दुनियेचा विचार करताना स्वतःचे अस्तित्व विसरले सगळे
पद मिळालं पैसा मिळाला संपत्ती मिळाली माणुसकी विसरले सगळे
लग्न आलं जात बघितली समाजातील लोकं स्वार्थ साधण्यासाठी
माणसाची जात विसरले सगळे
आयुष्य मिळालं जबाबदारी आली अनं जगणं विसरले सगळे...
कालांतराने लोकं सगळं विसरतातच फक्त काही आठवणी कायम असतात
ज्या जपायच्या असतात,
तरीही स्वतःच्या आनंदाला विसरून दुनियेचा विचार करून
जगतात सगळे....
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here