समुद्र.... (रहस्यमय न उलगडलेले एक गुपित)
उधळती समुद्राच्या वाऱ्याबरोबर लाटा,
आतमध्ये दडलेल्या प्रश्नांना मिळतात मनासारख्या वाटा.
किनारी ओथंबून वाहे शांत निर्मळ हवा,
मेघ बरसती आठवती सुखद क्षणांचा तो गारवा.
आकाशाचा रंग तू पांघरलास सभोवती,
खळखळाट आवाज पाण्याचा गाणे मंजुळ गाती.
आयुष्य हे तुझ्यासारखे खोल रुंद पातळी,
स्वतः जळत राहूनही प्रकाश देई मेणबत्ती मधील सुतळी.
तुझ्यातील भरती ओहोटीचे कौतुक असे,
समुद्राचे ते वेगळेच रूप मग दिसे.
भरतीचा नाही कुठला गर्व त्यास,
ओहोटीची ही नाही कुठली खंत त्याच्या मनास.
रोज नव्याने तू जगुनी घेतो,
असला उन्हाळा ही पाटीवर तू झेलतो.
रात्री सोबतीस असे चांदण्याचा शिंपलेला सडा,
खूप काही शिकण्यासारखे मिळतो जीवनास नवीन धडा.
तुझी किती आहे ती अबोल वेगळी भाषा,
उमटवतोस जगण्याची नवीन एक आशा.
असे तुझे रहस्यमय दडलेले एक गुपित,
कधीच न उलगडलेले कोडे सामावून घेऊ आयुष्याच्या मुठीत
©Mayuri Bhosale
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here