*आई सावित्रीबाई फुले*
सांगा नसती सावित्री माई
तर शिकली असती का बाई
त्यांना घडवणारे ज्योतीबा फुले
तुम्हा गुलामीच्या बंधनातून मुक्त केले
आज तुम्ही शिकले सवरले
मोठ्या पदावरही गेले
सांगा सावित्रीबाई च्या लेकींनो
तुम्ही त्यांना काय दिले
आपल्यासाठी किती त्यांनी
दगड, शेण, घाण माती झेलले
त्यांना तुमची दुरावस्था दिसत होती
म्हणून त्यांनी समाज कंटकांना पेलले
ज्यांनी आपल्याला घडवलं
त्यांच्या कार्याला तुम्ही विसरले
एवढी शिक्षणाच्या क्षेत्रात
वैज्ञानिक प्रगती झाली
पण आजही स्त्री !
अंधश्रद्धेला बळी पडली
ज्यांनी शिकवले घडवले
त्यांना विसरुनी जावे
जे शिकले शिकवले नाही
त्यांना च का स्मरण करावे!
स, च काय सावित्री सांगावे
स, सरस्वतीचा सांगू नये
आहे सावित्री माई ची आन
बेइमानी कोणी करू नये
होती सावित्रीबाई फुले
म्हणून तुझे जीवन उद्धारले
नव्हती मुभा शिकण्याची तुम्हा
म्हणून शिक्षणाचे दार उघडे केले
मानावे तितुके कमी आहे
फुले दाम्पत्याचे आभार
मृत्यू पर्यंत फेडू शकत नाही त्याचं उपकार
पण करत राहू असेपर्यंत
त्यांच्या कार्याचा प्रचार प्रसार
तेव्हा होईल सावित्रीबाई फुलेंचा
स्वप्न साकार
कवी. बाळकृष्ण राऊत
देवरी
©Bablukumar Raut
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here