चुका होत जातील...
तू सुधारत जा....
वाटा सापडत जातील...
तू शोधत जा....
माणसं बदलत जातील...
तू स्वीकारत जा....
परिस्थिती शिकवत जातील...
तू शिकत जा....
येणारे दिवस निघून जातील...
तू क्षण जपत जा....
विश्वास तोडून अनेक जातील...
तू सावरत जा....
प्रसंग परीक्षा घेऊन जातील...
तू क्षमता दाखवत जा....
आयुष्यातल्या घटना खडतरता दाखवत जातील...
तू टिकवून दाखवत जा....
आयुष्य आहे..... चालायचंच !
- यश सावरतकर
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here