...❣️...ती म्हणजे...❣️...
ती म्हणजे झुळूक ती म्हणजे वारा
ती म्हणजे पाऊस ती म्हणजे गारा...
कधी ती पाखरांचे बोल तर कधी ती अबोल
कधी ती आकाश तर कधी ती दर्याहून खोल...
कधी सापडते माझीच मला
कधी मनाच्या गावात...
कधी पाहतो स्वप्नात तिला
कधी राधेच्या नावात...
- यश सावरतकर
** ती **