Monika

Monika

  • Latest
  • Popular
  • Video
#Motivational

राजा आमचा महान

171 View

#Motivational

आयुष्याचे गणित

135 View

शब्द धन असे सोबती

153 View

#मराठीकविता #प्रीत

#प्रीत तुझी माझी

2,901 View

#मराठीकविता #निसर्ग  रंगा रंगा ने व्यापलेला तू
किती सुंदर निसर्ग तू
रंग बेरंगी फुल मनाला भाळतात
त्यात रम्य होऊन पाहावी  वाटतात

डोंगराची ती मोठी वस्ती
त्यामध्ये झाडे वेलींची गर्दी
नद्या नाले ओढे धुंद हवा
कधी जाऊन समोर पहा
झाडाच्या वेळीवर झुलत राहावं
कधी झऱ्यातून चालून पाहावं

आज ही देई तो तीच थंड गार हवा
एक झाड आज ही लावून पहा
प्रेम करा निसर्गावर त्याच्या
सुंदर अश्या मनमोहक रूपावर


निसर्गाने दिले आपल्याला आरोग्याचे
दाण
पशु, पक्षी, झाडे, मनुष्य गाई
त्याचे गुणगान
हेच सार आहे आपल्या मनात
म्हणून तर आपण आहोत निसर्गाच्या
सानिध्यात

असं आमच्या कोकणातील निसर्ग आहे भारी
आमच्या गावातील निसर्गाची खरच बात न्यारी
असं सुंदर स्वच्छ निसर्ग आहे किती छान
सर्वांना आहे खरच त्याचा अभिमान

1

©Monika
#मराठीकविता  प्रेमाच्या त्या नगरीत सख्या दोघेही
जोडीनं जाऊ
आपल्या नवख्या प्रेमाची ही प्रीत
नव्याने लिहू
हृदय एक आहे आपुल
त्यास एकाच स्पंदनाची साथ
ओलांडून उंबरठा बंधनाचा
लिहू सख्या प्रेमाची नवी बात 

रुसवे फुगवे हे पुरावे आहेत प्रेमाचे
एकमेकांना मनवण्यात असतात बहाणे मनाचे
वाहतो वारा घेऊन आसमंत हा सारा
मनातून वाहतो प्रीतीचा हा झरा
तुलना करणं तस तुझ्याशी कोणालाच
शोभत नाही
तुझ्या सारखे रंग त्या इंद्रधनुष्यात
ही नाही

तशी प्रीत तुझी माझी जगावेगळी 
झुलणाऱ्या वाऱ्याला  सांगते ती कळी
तुला म्हणतात धुंद पवन तर
मी आहे गंध कळी
पाहिलेले स्वप्न सख्या आता सत्यात ते उतरावे
रंग वेडे ते ते इंद्रधनु मग लोचणी मज दिसावे

राधेला ओढ  होती कृष्णाच्या भेटीची
तशीच ओढ लागे जिवा तुझ्या एका भेटीची 
प्रीती ची नाती आहेत ही जन्मातरीची
तुझ्या या छंदात  रेशीम बंधात झाले मी खुली
प्रीत तुझी माझी सख्या खरच आहे जगावेगळी

©Monika

प्रीत तुझी माझी

111 View

Trending Topic