प्रेमाच्या त्या नगरीत सख्या दोघेही
जोडीनं जाऊ
आपल्या नवख्या प्रेमाची ही प्रीत
नव्याने लिहू
हृदय एक आहे आपुल
त्यास एकाच स्पंदनाची साथ
ओलांडून उंबरठा बंधनाचा
लिहू सख्या प्रेमाची नवी बात
रुसवे फुगवे हे पुरावे आहेत प्रेमाचे
एकमेकांना मनवण्यात असतात बहाणे मनाचे
वाहतो वारा घेऊन आसमंत हा सारा
मनातून वाहतो प्रीतीचा हा झरा
तुलना करणं तस तुझ्याशी कोणालाच
शोभत नाही
तुझ्या सारखे रंग त्या इंद्रधनुष्यात
ही नाही
तशी प्रीत तुझी माझी जगावेगळी
झुलणाऱ्या वाऱ्याला सांगते ती कळी
तुला म्हणतात धुंद पवन तर
मी आहे गंध कळी
पाहिलेले स्वप्न सख्या आता सत्यात ते उतरावे
रंग वेडे ते ते इंद्रधनु मग लोचणी मज दिसावे
राधेला ओढ होती कृष्णाच्या भेटीची
तशीच ओढ लागे जिवा तुझ्या एका भेटीची
प्रीती ची नाती आहेत ही जन्मातरीची
तुझ्या या छंदात रेशीम बंधात झाले मी खुली
प्रीत तुझी माझी सख्या खरच आहे जगावेगळी
©Monika
प्रीत तुझी माझी