nisha Kharatshinde

nisha Kharatshinde Lives in Kolhapur, Maharashtra, India

✍️काव्यनिश

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

मी एक डिपार्टमेंट कुणाला माझी आता काळजीच नाही पहिल्यासारखे काही राहिलेच नाही कित्येक आले कित्येक गेले माझी व्यथा कुणा कळलीच नाही चाललंय ना डिपार्टमेंट एवढंच सर्वा दिसत आले कुणावाचून काही अडत नाही सगळेच असे म्हणत आले मनापासून काम करणारे क्वचितच मला समजू शकले नाहीतर पाट्या टाकणारे मलाच नावे ठेवून गेले पहिले कसे बरे होते प्रेम करणारे जुणे होते सहवासातील काही वर्षांतच डिपार्टमेंट घर होत होते काही वर्षे गेली की प्रेम जडते त्यांचे माझ्यावर मी ही फिदा होतो मग माझ्या स्टाफ परिवारावर स्वच्छता, नीटनेटकेपणा सर्व मनापासून असते मग माझे ते...मी त्यांचा आपलेपण येते मग शिकूदेत त्यांनाही इच्छेने एक घरपरिवार होऊदेत सेवेलाही जोर येईल मग सर्व प्रोब्लेम दूर होऊदेत नका बदलू इच्छेविरुद्ध डिपार्टमेंट जोरात चालूदेत काही चुकलं असेलतर नियम अर्थातच लागूदेत मी एक डिपार्टमेंट माझी व्यथा मला मांडूदेत चाललंय ना व्यवस्थीत जिथे तिथे तसंच चालूदेत..सेवेला बळ येऊदेत ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

 मी एक डिपार्टमेंट

कुणाला माझी आता काळजीच नाही
पहिल्यासारखे काही राहिलेच नाही
कित्येक आले कित्येक गेले
माझी व्यथा कुणा कळलीच नाही

चाललंय ना डिपार्टमेंट 
एवढंच सर्वा दिसत आले
कुणावाचून काही अडत नाही
सगळेच असे म्हणत आले

मनापासून काम करणारे
क्वचितच मला समजू शकले
नाहीतर पाट्या टाकणारे
मलाच नावे ठेवून गेले

पहिले कसे बरे होते
प्रेम करणारे जुणे होते
सहवासातील काही वर्षांतच
डिपार्टमेंट घर होत होते

काही वर्षे गेली की
प्रेम जडते त्यांचे माझ्यावर
मी ही फिदा होतो मग
माझ्या स्टाफ परिवारावर

स्वच्छता, नीटनेटकेपणा
सर्व मनापासून असते मग
माझे ते...मी त्यांचा
आपलेपण येते मग

शिकूदेत त्यांनाही इच्छेने
एक घरपरिवार होऊदेत
सेवेलाही जोर येईल मग
सर्व प्रोब्लेम दूर होऊदेत

नका बदलू इच्छेविरुद्ध
डिपार्टमेंट जोरात चालूदेत
काही चुकलं असेलतर
नियम अर्थातच लागूदेत

मी एक डिपार्टमेंट
माझी व्यथा मला मांडूदेत
चाललंय ना व्यवस्थीत जिथे
तिथे तसंच चालूदेत..सेवेला बळ येऊदेत

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

मी एक डिपार्टमेंट

15 Love

मुके जाहले‌ शब्द मुके जाहले शब्द वेदनेतून उमललेले गवसले नाही काहीही तरीही शिंपीत सडा गेले मौनाची ती पंक्ती दुसरा गुंता भावनेचा शल्य गवसले त्रीपंक्तीत चौथीत काहूर मनाचा अबोला हा कल्पनेचा की दडलेला समझोता शपथबद्ध भासले जणू दाटला गूढ अर्थ होता ✍️ निशा खरात/शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde

 मुके जाहले‌ शब्द

मुके जाहले शब्द
वेदनेतून उमललेले
गवसले नाही काहीही
तरीही शिंपीत सडा गेले

मौनाची ती पंक्ती
दुसरा गुंता भावनेचा
शल्य गवसले त्रीपंक्तीत
चौथीत काहूर मनाचा

अबोला हा कल्पनेचा
की दडलेला समझोता
शपथबद्ध भासले जणू
दाटला गूढ अर्थ होता

✍️ निशा खरात/शिंदे 
      (काव्यनिश)

©nisha Kharatshinde

मुके जाहले शब्द

12 Love

White मी गंध.......................... तू मनी जपलेल्या ‌मोगरयाचा कधी दरवळते कधी गंधहीन कधी स्वप्नात कधी कल्पनेत कधी लेखनीत पण तुझ्याविन ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

#sunset_time  White मी गंध.......................... 
तू मनी जपलेल्या ‌मोगरयाचा
कधी दरवळते कधी गंधहीन
कधी स्वप्नात कधी कल्पनेत
कधी लेखनीत पण तुझ्याविन

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

#sunset_time मी गंध....

10 Love

कष्टातून वरती आलेल्या सर्वांचे हसू खोटे चेहर्यावरती असते दुःख जरी दिसत नसले.. तरी खोलवर रुतलेले असते.. प्रगतीकडे जाता जाता काट्यांचाही माळ लागतो हळव्या मनाला टोचणारा तो स्पर्शही अबोल असतो भावनांचा गुंता आत शब्दप्रवाह तीव्र असतो संभाळावे कसे किती मनाला अन् असाच मग तोल जातो तरीही का आज वाईट वाटे नाते नाही तुझे नी माझे हळहळले मात्र आज हृदय तेवढेच नव्हते रे जग तुझे ✍️निशा खरात/शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde

 कष्टातून वरती आलेल्या सर्वांचे
हसू खोटे चेहर्यावरती असते
दुःख जरी दिसत नसले..
तरी खोलवर रुतलेले असते..

प्रगतीकडे जाता जाता
काट्यांचाही माळ लागतो
हळव्या मनाला टोचणारा
तो स्पर्शही अबोल असतो

भावनांचा गुंता आत
शब्दप्रवाह तीव्र असतो
संभाळावे कसे किती मनाला
अन् असाच मग तोल जातो

तरीही का आज वाईट वाटे
नाते नाही तुझे नी माझे
हळहळले मात्र आज हृदय
तेवढेच नव्हते रे जग तुझे

✍️निशा खरात/शिंदे 
     (काव्यनिश)

©nisha Kharatshinde

?

10 Love

जगा अन् जगूद्या सध्या पन्नाशीही पार करणे खूप अवघड झालंय अन् आत्महत्या करणे अगदी सोपं झालंय पंचवीस वर्षाच्या नात्याला किंमत राहिली नाही दोन वर्षाच्या प्रेमासाठी कुणी आईचाही उरला नाही त्या रागापुढे सर्वच शून्य अहंकाराने डाव साधला वेदनांनी आवाज न करता भावनांचा गळा घोटला दुनियेचं हसू होईल अन् इज्जतीचा पंचनामा समजून घेऊ जग म्हणतं अन् पडद्याआडून जाहीरनामा इथं कुणी कुणाची निंदा करते स्तुती मात्र क्वचित तिरस्काराने एकमेकांच्या संपली माणुसकीही निश्र्चित अफवांवर पांघरुण घालणारे पडतात फसवणुकीत बळी माहेर आहेर संपलय आता जन्मत:च खुंटते कळी जगा अन् जगूद्या सर्वा या महामारीच्या परिस्थितीत अत्यल्प आयुष्य उरलय बदल करा मनस्थितीत ✍️ निशा खरात/शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde

 जगा अन् जगूद्या

सध्या पन्नाशीही पार करणे
खूप अवघड झालंय
अन् आत्महत्या करणे
अगदी सोपं झालंय

पंचवीस वर्षाच्या नात्याला
किंमत राहिली नाही
दोन वर्षाच्या प्रेमासाठी
कुणी आईचाही उरला नाही

त्या रागापुढे सर्वच शून्य
अहंकाराने डाव साधला
वेदनांनी आवाज न करता
भावनांचा गळा घोटला

दुनियेचं हसू होईल
अन् इज्जतीचा पंचनामा
समजून घेऊ जग म्हणतं
अन् पडद्याआडून जाहीरनामा

इथं कुणी कुणाची निंदा करते
स्तुती मात्र क्वचित
तिरस्काराने एकमेकांच्या
संपली माणुसकीही निश्र्चित

अफवांवर पांघरुण घालणारे
पडतात फसवणुकीत बळी
माहेर आहेर संपलय आता
जन्मत:च खुंटते कळी

जगा अन् जगूद्या सर्वा
या महामारीच्या परिस्थितीत
अत्यल्प आयुष्य उरलय
बदल करा  मनस्थितीत

✍️ निशा खरात/शिंदे
       (काव्यनिश)

©nisha Kharatshinde

जगा अन् जगू द्या

17 Love

आत्महत्या शेवट पर्याय आहे का ? ज्या आई-वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपले....तुमच्या टिचभर पोटासाठी,स्वप्नांसाठी दिवसरात्र स्वत:ला झिजविले...तुमच्या उज्वल भवि तव्यासाठी स्वत:च्या स्वप्नांचाही कधी विचार नाही केला..तुम्ही एका ठराविक लेवलला पोहचेपर्यंत अद्याप सुखाचा श्र्वासही घेतलेला नाही...त्यांच्या प्रेमाची, कर्जाची परतफेड ही अशी..'आत्महत्या' करुन'.. त्या आई-वडिलांना तुमच्या मागे एकटे रडायला सोडून....मग लाचार आहात तुम्ही..स्वार्थी आहात तुम्ही.. तुमच्या अपेक्षा,तुमच्या गरजा,तुमची स्वप्ने,तुम्हाला भेटलेली माणसे ..हे तुमच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रु पेक्षा तुम्हाला आज मोठे वाटले असेल तर.... खूप लाजीरवाणी गोष्ट आहे... आयुष्यात चढउतार,यश-अपयश हे चालूच राहणार...स्पर्धेच्या जगात आई वडिलांशिवाय इतर कुणा कडून पण अपेक्षा केली तर तिचा भंग निश्र्चितच... म्हणून पळ काढायला आत्महत्या हा त्यावर उपाय न्हवे... आज प्रत्येक क्षेत्रात राजकारण आहेच... समोरच्याला सावरणारे,समजून घेणारे,पुढे न्हेणारे,फार कमी लोक आहेत...एखादे अपयश,अपमानास्तव वागणूक,आपल्यावर लादलेले खोटे आरोप,अपेक्षा भंग,मैत्री,प्रेमप्रकरणे त्यातून आलेले नैराश्य यामुळे आपण खचून जातो...हे आपल्याला आत्महत्येला प्रवृत्त करते..म्हणून असा पळ काढायचा का??एवढयात हार मानणारे तुम्ही आम्ही नाही... एकदा का लहानपण सरले आणि रणांगणात आपण उतरलो..तर ह्या कलयुगात शेवटपर्यंत लढण्यासाठीच हा... रणांगणात घाबरुन,हतबल होऊन ‌स्वतःला संपवणे हा त्यामागील पर्याय न्हवे...तर लढा..ज्या ज्या वेळेस खचून जाल,मनोबल कमी पडेल ‌त्या त्या वेळेस दोन मिनिटे तरी डोळे बंद करुन ‌आपले आई-वडील आणि आपले आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि शेवटच्या श्र्वासापर्यंत लढणारे संभाजी महाराज यांना नक्की आठवा... मित्र हो आयुष्य एकदाच आहे...देवाने दिलेले हे सुंदर आयुष्य संपवण्याआधी स्वतःचा केवळ विचार न करता तुमच्यावर प्रेम करणारे, तुमच्यावर अवलंबून असणारे यांचाही थोडा विचार करा... असे लाखो सुशांत आजही या समाजात तुमच्या आमच्यात या समाजाशी लढत आपले अस्तीत्व निर्माण करीत आहेत...पण कुणाला किती महत्त्व द्यायचे,किती दुर्लक्ष करायचे,किती खचायचे,पुन्हा स्वतःला कसे सावरायचे..स्वत:ची स्वप्ने तुटली तरीही पुन्हा तीच स्वप्ने घेऊन पुन्हा त्याच वाटेने किंवा वाट बदलून पुढे कसे चालायचे,किती दुःखे पचवायची कितींना सामोरे जायचे ते ही हतबल न होता...हे सर्व आपल्यात,आपल्या विचारांत असते.. त्याबरोबर जिद्द पण असणे महत्त्वाचे असते...यातून जो पुढे जातो..तोच पुढे जातो..नाहीतर अश्याच एखाद्या सुशांतचा तोल मग जातो.. कष्टातून वरती आलेल्या काहींचे हसू खोटे चेहर्यावरती असते दुःख जरी दिसत नसले.. तरी खोलवर रुतलेले असते.. प्रगतीकडे जाता जाता काट्यांचाही माळ लागतो हळव्या मनाला टोचणारा तो स्पर्शही अबोल असतो भावनांचा गुंता आत शब्दप्रवाह तीव्र असतो संभाळावे कसे किती मनाला अन् असाच मग तोल जातो ✍️निशा खरात/शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde

 आत्महत्या शेवट पर्याय आहे का ?

   ज्या आई-वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपले....तुमच्या टिचभर पोटासाठी,स्वप्नांसाठी दिवसरात्र स्वत:ला झिजविले...तुमच्या उज्वल भवि
तव्यासाठी स्वत:च्या स्वप्नांचाही कधी विचार नाही केला..तुम्ही एका ठराविक लेवलला पोहचेपर्यंत अद्याप सुखाचा श्र्वासही घेतलेला नाही...त्यांच्या प्रेमाची, कर्जाची परतफेड ही अशी..'आत्महत्या' करुन'.. त्या आई-वडिलांना तुमच्या मागे एकटे रडायला सोडून....मग लाचार आहात तुम्ही..स्वार्थी आहात तुम्ही.. तुमच्या अपेक्षा,तुमच्या गरजा,तुमची स्वप्ने,तुम्हाला भेटलेली माणसे ..हे तुमच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रु पेक्षा तुम्हाला आज मोठे वाटले असेल तर.... खूप लाजीरवाणी गोष्ट आहे...
     आयुष्यात चढउतार,यश-अपयश हे चालूच राहणार...स्पर्धेच्या जगात आई वडिलांशिवाय इतर कुणा कडून पण अपेक्षा केली तर तिचा भंग निश्र्चितच... म्हणून पळ काढायला आत्महत्या हा त्यावर उपाय न्हवे... आज प्रत्येक क्षेत्रात राजकारण आहेच... समोरच्याला सावरणारे,समजून घेणारे,पुढे न्हेणारे,फार कमी लोक आहेत...एखादे अपयश,अपमानास्तव वागणूक,आपल्यावर लादलेले खोटे आरोप,अपेक्षा भंग,मैत्री,प्रेमप्रकरणे त्यातून आलेले नैराश्य यामुळे आपण खचून जातो...हे आपल्याला आत्महत्येला प्रवृत्त करते..म्हणून असा पळ काढायचा का??एवढयात हार मानणारे तुम्ही आम्ही नाही...
      एकदा का लहानपण सरले आणि रणांगणात आपण उतरलो..तर ह्या कलयुगात शेवटपर्यंत लढण्यासाठीच हा... रणांगणात घाबरुन,हतबल होऊन ‌स्वतःला संपवणे हा त्यामागील पर्याय न्हवे...तर लढा..ज्या ज्या वेळेस खचून जाल,मनोबल कमी पडेल ‌त्या त्या वेळेस दोन मिनिटे तरी डोळे बंद करुन ‌आपले आई-वडील आणि आपले आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि शेवटच्या श्र्वासापर्यंत लढणारे संभाजी महाराज यांना नक्की आठवा...
      मित्र हो आयुष्य एकदाच आहे...देवाने दिलेले हे सुंदर आयुष्य संपवण्याआधी स्वतःचा केवळ विचार न करता तुमच्यावर प्रेम करणारे, तुमच्यावर अवलंबून असणारे यांचाही थोडा विचार करा... असे लाखो सुशांत आजही या समाजात तुमच्या आमच्यात या समाजाशी लढत आपले अस्तीत्व निर्माण करीत आहेत...पण कुणाला किती महत्त्व द्यायचे,किती दुर्लक्ष करायचे,किती खचायचे,पुन्हा स्वतःला कसे सावरायचे..स्वत:ची स्वप्ने तुटली तरीही पुन्हा तीच स्वप्ने घेऊन पुन्हा त्याच वाटेने किंवा वाट बदलून पुढे कसे चालायचे,किती दुःखे पचवायची कितींना सामोरे जायचे ते ही हतबल न होता...हे सर्व आपल्यात,आपल्या विचारांत असते.. त्याबरोबर जिद्द पण असणे महत्त्वाचे असते...यातून जो पुढे जातो..तोच पुढे जातो..नाहीतर अश्याच एखाद्या सुशांतचा तोल मग जातो..

कष्टातून वरती आलेल्या काहींचे
हसू खोटे चेहर्यावरती असते
दुःख जरी दिसत नसले..
तरी खोलवर रुतलेले असते..

प्रगतीकडे जाता जाता
काट्यांचाही माळ लागतो
हळव्या मनाला टोचणारा
तो स्पर्शही अबोल असतो

भावनांचा गुंता आत
शब्दप्रवाह तीव्र असतो
संभाळावे कसे किती मनाला
अन् असाच मग तोल जातो

✍️निशा खरात/शिंदे 
      (काव्यनिश)

©nisha Kharatshinde

आत्महत्या शेवट पर्याय आहे का?

11 Love

Trending Topic