आत्महत्या शेवट पर्याय आहे का ?

   ज्या आई-वडिलांन
  • Latest
  • Popular
  • Video

आत्महत्या शेवट पर्याय आहे का ? ज्या आई-वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपले....तुमच्या टिचभर पोटासाठी,स्वप्नांसाठी दिवसरात्र स्वत:ला झिजविले...तुमच्या उज्वल भवि तव्यासाठी स्वत:च्या स्वप्नांचाही कधी विचार नाही केला..तुम्ही एका ठराविक लेवलला पोहचेपर्यंत अद्याप सुखाचा श्र्वासही घेतलेला नाही...त्यांच्या प्रेमाची, कर्जाची परतफेड ही अशी..'आत्महत्या' करुन'.. त्या आई-वडिलांना तुमच्या मागे एकटे रडायला सोडून....मग लाचार आहात तुम्ही..स्वार्थी आहात तुम्ही.. तुमच्या अपेक्षा,तुमच्या गरजा,तुमची स्वप्ने,तुम्हाला भेटलेली माणसे ..हे तुमच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रु पेक्षा तुम्हाला आज मोठे वाटले असेल तर.... खूप लाजीरवाणी गोष्ट आहे... आयुष्यात चढउतार,यश-अपयश हे चालूच राहणार...स्पर्धेच्या जगात आई वडिलांशिवाय इतर कुणा कडून पण अपेक्षा केली तर तिचा भंग निश्र्चितच... म्हणून पळ काढायला आत्महत्या हा त्यावर उपाय न्हवे... आज प्रत्येक क्षेत्रात राजकारण आहेच... समोरच्याला सावरणारे,समजून घेणारे,पुढे न्हेणारे,फार कमी लोक आहेत...एखादे अपयश,अपमानास्तव वागणूक,आपल्यावर लादलेले खोटे आरोप,अपेक्षा भंग,मैत्री,प्रेमप्रकरणे त्यातून आलेले नैराश्य यामुळे आपण खचून जातो...हे आपल्याला आत्महत्येला प्रवृत्त करते..म्हणून असा पळ काढायचा का??एवढयात हार मानणारे तुम्ही आम्ही नाही... एकदा का लहानपण सरले आणि रणांगणात आपण उतरलो..तर ह्या कलयुगात शेवटपर्यंत लढण्यासाठीच हा... रणांगणात घाबरुन,हतबल होऊन ‌स्वतःला संपवणे हा त्यामागील पर्याय न्हवे...तर लढा..ज्या ज्या वेळेस खचून जाल,मनोबल कमी पडेल ‌त्या त्या वेळेस दोन मिनिटे तरी डोळे बंद करुन ‌आपले आई-वडील आणि आपले आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि शेवटच्या श्र्वासापर्यंत लढणारे संभाजी महाराज यांना नक्की आठवा... मित्र हो आयुष्य एकदाच आहे...देवाने दिलेले हे सुंदर आयुष्य संपवण्याआधी स्वतःचा केवळ विचार न करता तुमच्यावर प्रेम करणारे, तुमच्यावर अवलंबून असणारे यांचाही थोडा विचार करा... असे लाखो सुशांत आजही या समाजात तुमच्या आमच्यात या समाजाशी लढत आपले अस्तीत्व निर्माण करीत आहेत...पण कुणाला किती महत्त्व द्यायचे,किती दुर्लक्ष करायचे,किती खचायचे,पुन्हा स्वतःला कसे सावरायचे..स्वत:ची स्वप्ने तुटली तरीही पुन्हा तीच स्वप्ने घेऊन पुन्हा त्याच वाटेने किंवा वाट बदलून पुढे कसे चालायचे,किती दुःखे पचवायची कितींना सामोरे जायचे ते ही हतबल न होता...हे सर्व आपल्यात,आपल्या विचारांत असते.. त्याबरोबर जिद्द पण असणे महत्त्वाचे असते...यातून जो पुढे जातो..तोच पुढे जातो..नाहीतर अश्याच एखाद्या सुशांतचा तोल मग जातो.. कष्टातून वरती आलेल्या काहींचे हसू खोटे चेहर्यावरती असते दुःख जरी दिसत नसले.. तरी खोलवर रुतलेले असते.. प्रगतीकडे जाता जाता काट्यांचाही माळ लागतो हळव्या मनाला टोचणारा तो स्पर्शही अबोल असतो भावनांचा गुंता आत शब्दप्रवाह तीव्र असतो संभाळावे कसे किती मनाला अन् असाच मग तोल जातो ✍️निशा खरात/शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde

 आत्महत्या शेवट पर्याय आहे का ?

   ज्या आई-वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपले....तुमच्या टिचभर पोटासाठी,स्वप्नांसाठी दिवसरात्र स्वत:ला झिजविले...तुमच्या उज्वल भवि
तव्यासाठी स्वत:च्या स्वप्नांचाही कधी विचार नाही केला..तुम्ही एका ठराविक लेवलला पोहचेपर्यंत अद्याप सुखाचा श्र्वासही घेतलेला नाही...त्यांच्या प्रेमाची, कर्जाची परतफेड ही अशी..'आत्महत्या' करुन'.. त्या आई-वडिलांना तुमच्या मागे एकटे रडायला सोडून....मग लाचार आहात तुम्ही..स्वार्थी आहात तुम्ही.. तुमच्या अपेक्षा,तुमच्या गरजा,तुमची स्वप्ने,तुम्हाला भेटलेली माणसे ..हे तुमच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रु पेक्षा तुम्हाला आज मोठे वाटले असेल तर.... खूप लाजीरवाणी गोष्ट आहे...
     आयुष्यात चढउतार,यश-अपयश हे चालूच राहणार...स्पर्धेच्या जगात आई वडिलांशिवाय इतर कुणा कडून पण अपेक्षा केली तर तिचा भंग निश्र्चितच... म्हणून पळ काढायला आत्महत्या हा त्यावर उपाय न्हवे... आज प्रत्येक क्षेत्रात राजकारण आहेच... समोरच्याला सावरणारे,समजून घेणारे,पुढे न्हेणारे,फार कमी लोक आहेत...एखादे अपयश,अपमानास्तव वागणूक,आपल्यावर लादलेले खोटे आरोप,अपेक्षा भंग,मैत्री,प्रेमप्रकरणे त्यातून आलेले नैराश्य यामुळे आपण खचून जातो...हे आपल्याला आत्महत्येला प्रवृत्त करते..म्हणून असा पळ काढायचा का??एवढयात हार मानणारे तुम्ही आम्ही नाही...
      एकदा का लहानपण सरले आणि रणांगणात आपण उतरलो..तर ह्या कलयुगात शेवटपर्यंत लढण्यासाठीच हा... रणांगणात घाबरुन,हतबल होऊन ‌स्वतःला संपवणे हा त्यामागील पर्याय न्हवे...तर लढा..ज्या ज्या वेळेस खचून जाल,मनोबल कमी पडेल ‌त्या त्या वेळेस दोन मिनिटे तरी डोळे बंद करुन ‌आपले आई-वडील आणि आपले आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि शेवटच्या श्र्वासापर्यंत लढणारे संभाजी महाराज यांना नक्की आठवा...
      मित्र हो आयुष्य एकदाच आहे...देवाने दिलेले हे सुंदर आयुष्य संपवण्याआधी स्वतःचा केवळ विचार न करता तुमच्यावर प्रेम करणारे, तुमच्यावर अवलंबून असणारे यांचाही थोडा विचार करा... असे लाखो सुशांत आजही या समाजात तुमच्या आमच्यात या समाजाशी लढत आपले अस्तीत्व निर्माण करीत आहेत...पण कुणाला किती महत्त्व द्यायचे,किती दुर्लक्ष करायचे,किती खचायचे,पुन्हा स्वतःला कसे सावरायचे..स्वत:ची स्वप्ने तुटली तरीही पुन्हा तीच स्वप्ने घेऊन पुन्हा त्याच वाटेने किंवा वाट बदलून पुढे कसे चालायचे,किती दुःखे पचवायची कितींना सामोरे जायचे ते ही हतबल न होता...हे सर्व आपल्यात,आपल्या विचारांत असते.. त्याबरोबर जिद्द पण असणे महत्त्वाचे असते...यातून जो पुढे जातो..तोच पुढे जातो..नाहीतर अश्याच एखाद्या सुशांतचा तोल मग जातो..

कष्टातून वरती आलेल्या काहींचे
हसू खोटे चेहर्यावरती असते
दुःख जरी दिसत नसले..
तरी खोलवर रुतलेले असते..

प्रगतीकडे जाता जाता
काट्यांचाही माळ लागतो
हळव्या मनाला टोचणारा
तो स्पर्शही अबोल असतो

भावनांचा गुंता आत
शब्दप्रवाह तीव्र असतो
संभाळावे कसे किती मनाला
अन् असाच मग तोल जातो

✍️निशा खरात/शिंदे 
      (काव्यनिश)

©nisha Kharatshinde

आत्महत्या शेवट पर्याय आहे का?

11 Love

Trending Topic