मी एक डिपार्टमेंट
कुणाला माझी आता काळजीच नाही
पहिल्यासारखे काही राहिलेच नाही
कित्येक आले कित्येक गेले
माझी व्यथा कुणा कळलीच नाही
चाललंय ना डिपार्टमेंट
एवढंच सर्वा दिसत आले
कुणावाचून काही अडत नाही
सगळेच असे म्हणत आले
मनापासून काम करणारे
क्वचितच मला समजू शकले
नाहीतर पाट्या टाकणारे
मलाच नावे ठेवून गेले
पहिले कसे बरे होते
प्रेम करणारे जुणे होते
सहवासातील काही वर्षांतच
डिपार्टमेंट घर होत होते
काही वर्षे गेली की
प्रेम जडते त्यांचे माझ्यावर
मी ही फिदा होतो मग
माझ्या स्टाफ परिवारावर
स्वच्छता, नीटनेटकेपणा
सर्व मनापासून असते मग
माझे ते...मी त्यांचा
आपलेपण येते मग
शिकूदेत त्यांनाही इच्छेने
एक घरपरिवार होऊदेत
सेवेलाही जोर येईल मग
सर्व प्रोब्लेम दूर होऊदेत
नका बदलू इच्छेविरुद्ध
डिपार्टमेंट जोरात चालूदेत
काही चुकलं असेलतर
नियम अर्थातच लागूदेत
मी एक डिपार्टमेंट
माझी व्यथा मला मांडूदेत
चाललंय ना व्यवस्थीत जिथे
तिथे तसंच चालूदेत..सेवेला बळ येऊदेत
✍️काव्यनिश
©nisha Kharatshinde
मी एक डिपार्टमेंट