कष्टातून वरती आलेल्या सर्वांचे
हसू खोटे चेहर्यावरती असते
दुःख जरी दिसत नसले..
तरी खोलवर रुतलेले असते..
प्रगतीकडे जाता जाता
काट्यांचाही माळ लागतो
हळव्या मनाला टोचणारा
तो स्पर्शही अबोल असतो
भावनांचा गुंता आत
शब्दप्रवाह तीव्र असतो
संभाळावे कसे किती मनाला
अन् असाच मग तोल जातो
तरीही का आज वाईट वाटे
नाते नाही तुझे नी माझे
हळहळले मात्र आज हृदय
तेवढेच नव्हते रे जग तुझे
✍️निशा खरात/शिंदे
(काव्यनिश)
©nisha Kharatshinde
?