शिल्पकार तुम्ही संविधानाचे कायदा तुम्ही रचला
तरीही या जगाला आंबेडकर अजून नाही कळला
हालाखीच्या दिवसांवर तुम्ही मात करून जगला
स्पृश्य-अस्पृश्य भेद नाहीसा करण्या अखंड तुम्ही झटला
सोपे नव्हते तरी लढा देऊन तुम्ही, समतेचा पताका फडकवला
तरीही या जगाला आंबेडकर अजून नाही कळला
लढला तुम्ही हक्कांसाठी, विद्येच्या समान कायद्यासाठी
बुरसटलेल्या विचारांना मोडून, सर्वांना एका धारेत आणण्यासाठी
तत्कालिन समाजासाठी तुम्ही, समतेचे बीज रुजवला
तरीही या जगाला आंबेडकर अजून नाही कळला
जोरावरती विद्वत्तेच्या जगास तुम्ही नमवले
तुमच्या विद्वत्ते ठाई भीमा, हात आम्ही जोडले
शिक्षण, नोकरी सर्व ठिकाणी तुम्ही हक्क मिळवून दिला
जातीच्या नावावर मात्र लोकांनी फायदाच पाहिला
आरक्षणाचे बोट धरून कोणीही खुर्चीवर बसला
खरच या जगाला आंबेडकर अजून नाही कळला
हेतू तुमचा स्वच्छच होता, समाजाला एकत्र आणण्याचा
लोकांनी परी घाट घातला तुम्हालाच वाटण्याचा
बँकेत राशी पैशांच्या परी आरक्षणावर डोळा
राखीव गुणाच्या जोरावरती शहाणपणाच्या कळा
गरज होती जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी खरच झटला
तरीही या जगाला आंबेडकर अजून नाही कळला
घ्या पुन्हा तुम्ही जन्म एकदा, ही विचारधारा बदलण्यासाठी
नव्याने जन्मलेला हा, जातीयवाद मोडून टाकण्यासाठी
करा कायदा पुन्हा एकदा सर्वांना समान न्याय करा
विद्वत्तेच्या जोडीला आर्थिक निकषांची कास धरा
तेव्हाच होईल खरा साकार,समाज आंबेडकरांच्या स्वप्नातला
खंत आहे या जगाला आंबेडकर अजून नाही कळला
आंबेडकर अजूनही नाही कळला
सौ. स्वप्नाली निलेश ढोणूक्षे.
©Swapnali Gurabe Dhonukshe
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here