White महापरिनिर्वाण दिन
मनुस्मृतीने तुला निच समजलं
तुला दासी समजुन उपभोगल
त्या मनुस्मृतीच दहन करून
आम्हा स्त्रियांना सन्मान मिळाला
तरी म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं?
आरक्षण तुम्हालाच दिलं म्हणत
कलम 340, 341,342लिहुन
या संपूर्ण बहुजन समाजाला न्याय दिला
म्हणून आम्ही डॉक्टर ,वकील, पायलट झालो
तरी म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं?
रूढी परंपरेने जखडलेल्या स्त्रीला
कधी वारसाहक्काने नाकारले तर
कधी समाजाने नाकारले त्या स्त्रियांना
हिंदू कोटबील देऊन गुलामगिरीतुन मुक्त केलं
तरी म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं?
पाणी पिण्याची मुभा नव्हती
चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन
मानवमुक्तीचा लढा दिला ,
पुरूषांसमान हक्क देऊन
प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया उच्च पदावर गेल्या
तरी म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केल?
शुद्र म्हणत मंदिराचा प्रवेश नाकारला
काळाराम मंदिराचा सत्याग्रह करुन
इथल्या मनुवाद्यांचा विटाळ दुर केला
तरी म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केल?
गर्भवती महिलेसोबत गर्भात असलेल्या
बाळाची काळजी घेणारा कायदा लिहुन
सर्वाना समता , स्वातंत्र्य, बंधुतेचा आधार दिला.
संविधान देऊन या भारताला समतेचा थारा दिला
तरी म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. ?
©komal borkar
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here