White समाजसुधारक महात्मा फुले
मुलींसाठी शाळा सुरू करून
स्त्रीमुक्तीचा मार्ग दाखविला
पाण्याचा हौद चालू करून,
अस्पृश्यांचा नवा इतिहास घडविला...
सावत्रीआईना शिकवून
नवा आदर्श समाजासमोर ठेवला
नाव्ह्यांचा संप घडवून ,
अनिष्ठ रुढीपरंपरेचा त्याग केला...
मनुवाद्यांशी लढा देऊन
मूलनिवासी लोकांना न्याय दिला
विधवा पुनर्विवाह करून
महिलांचा सन्मान केला...
बहुजनासाठी शाळा सुरू करुन
मनुवाद्यांवर घणाघाती प्रहार केला
सत्यशोधक समाजाची स्थापना करुन,
सत्य आणि मानवतेचा लढा दिला...
शिक्षणासाठी वस्तीगृह चालू करुन
अनेकांचा उध्दार केला
गुलामगिरीला नष्ट करून,
बहुजनांचा क्रांतिकारक होऊन गेला...
©komal borkar
#sad_quotes समाजसुधारक महात्मा फुले मराठी कविता