Pallavi Phadnis

Pallavi Phadnis

poet and writer

  • Latest
  • Popular
  • Video

White काही सुख, नाती मर्यादित ठेवतात तर काही दुःख अमर्याद नाती देऊन जातात ©Pallavi Phadnis

#love_shayari #Quotes  White काही सुख, नाती मर्यादित ठेवतात तर काही दुःख अमर्याद नाती देऊन जातात

©Pallavi Phadnis

#love_shayari

13 Love

ज्यावेळी बदल निरपेक्ष हवा असतो , धर्म,राष्ट्र रक्षणासाठी अहंकार,मत्सर, द्वेष बाजूला ठेवून, मतभेद असले तरी मनभेद न ठेवता एकत्र येणे गरजेचे असते ©Pallavi Phadnis

#Quotes  ज्यावेळी बदल
 निरपेक्ष हवा असतो , 
धर्म,राष्ट्र रक्षणासाठी 
अहंकार,मत्सर, द्वेष
 बाजूला ठेवून,
मतभेद असले तरी 
मनभेद न ठेवता
 एकत्र येणे गरजेचे असते

©Pallavi Phadnis

ज्यावेळी बदल निरपेक्ष हवा असतो , धर्म,राष्ट्र रक्षणासाठी अहंकार,मत्सर, द्वेष बाजूला ठेवून, मतभेद असले तरी मनभेद न ठेवता एकत्र येणे गरजेचे असते ©Pallavi Phadnis

11 Love

दारी सडा रांगोळी, दिव्यांच्या ओळी, गोधन,धनधान्य पूजावे दीर्घायुष्यासवे ,व्हावे लक्ष्मीचे आगमन, लक्ष्मीनारायणाचे व्हावे अतूट बंधन,बंधुभगिनीचे नाते जपता व्हावे शुभ दीपावली आगमन पल्लवी फडणीस,भोर✍️ ©Pallavi Phadnis

#Quotes  दारी सडा रांगोळी,
दिव्यांच्या ओळी, 
गोधन,धनधान्य पूजावे
 दीर्घायुष्यासवे ,व्हावे
 लक्ष्मीचे आगमन, 
लक्ष्मीनारायणाचे व्हावे 
अतूट बंधन,बंधुभगिनीचे
 नाते जपता व्हावे
 शुभ दीपावली आगमन
        पल्लवी फडणीस,भोर✍️

©Pallavi Phadnis

दारी सडा रांगोळी, दिव्यांच्या ओळी, गोधन,धनधान्य पूजावे दीर्घायुष्यासवे ,व्हावे लक्ष्मीचे आगमन, लक्ष्मीनारायणाचे व्हावे अतूट बंधन,बंधुभगिनीचे नाते जपता व्हावे शुभ दीपावली आगमन पल्लवी फडणीस,भोर✍️ ©Pallavi Phadnis

10 Love

White सत्य,संस्कार ,धर्म ,देशप्रेम हे जे चांगले आहे ते लोकांना दाखवा वाईट दाखवले की लोक तुम्हाला विरोधी समजतात जेंव्हा खरेच लोकांसमोर येईल त्यावेळी त्यांना वाईट काय आहे समजेल पण हे समजण्यासाठी बुद्धी हवी आणि त्यासाठी वरील संस्कार ,कर्म ,नीतिमत्ता चांगली हवी ©Pallavi Phadnis

#GoodMorning #Quotes  White सत्य,संस्कार ,धर्म ,देशप्रेम हे जे चांगले आहे ते लोकांना दाखवा वाईट दाखवले की लोक तुम्हाला विरोधी समजतात जेंव्हा खरेच लोकांसमोर येईल त्यावेळी त्यांना वाईट काय आहे समजेल पण हे समजण्यासाठी बुद्धी हवी आणि त्यासाठी वरील संस्कार ,कर्म ,नीतिमत्ता चांगली हवी

©Pallavi Phadnis

#GoodMorning

11 Love

#Droplet  अवखळ अल्लड पाऊस कित्ती 
प्रेमळ असतो ,येताना कसे
स्पंदनांचे ढग दाटून येतात
स्पर्शाचा उबऱ्याने सैल होतात

सैलावलेल्या थेंबांना काही 
बंधनेच नसतात ,उगाच बेफाम
होवून अंगणात नाचतात,थेंब न
कळत थकून धरणीतरंगाला भेटतात

काही लबाड थेंब कधी अळवावर
कधी फुलावर कधी कळीवर डोलतात
काही थेंब तर त्या लाजूळवर भाळतात
ते  बुजरेपान अलगद लाजून पर्णपदरात लपतात

असा अल्लड अवखळ पाऊस
कधी उनाड ,बेफाम ,कधी लाजरा
असतो ,पण काय बोलावे आता 
ह्याच्या येण्यानेच तरंगसाजन भेटतो

       पल्लवी फडणीस,भोर✍🏻

©Pallavi Phadnis

#Droplet

180 View

#sad_shayari  White असा सतत ओझरता पाऊस
किती आठवणी घेऊन येतो
थेंबाचे आवाज नी सरींचा नाच
डोळ्यात पाण्याची तडकलेली काच

वेळी अवेळी उगाच पडझड होते
शांत मनातील आठवण ढवळून जाते
कोणाशी पुसावे नी कोणावर रुसावे ,
मनात सतत सुटलेल्या क्षणांशी दावे

कोपऱ्यात शांत पडून असताना 
स्पंदनांना  साथ दबक्या हुंदक्यांची
मनाच्या घुसमटतीत प्राण द्यावे त्यागून 
ही आस असते अव्हेरल्या देहाची

कानावर पडणारे जलथेंब कधी
मोत्यांच्या मनमोहक होत्या सरी
आता मात्र बंद मनात केवळ नी
केवळ एकलेपणावर आठव आरी

सगळे सगळे वाहून जाताना
मनात का कित्ती साठून राहते ,
कितीदा द्यावी सोडून मोहाची नौका ,तरी
पुन्हा पुन्हा देहकिनाऱ्यावरच डोलते

         पल्लवी फडणीस,भोर✍️

©Pallavi Phadnis

#sad_shayari

189 View

Trending Topic