White असा सतत ओझरता पाऊस
किती आठवणी घेऊन येतो
थेंबाचे आवाज नी सरींचा नाच
डोळ्यात पाण्याची तडकलेली काच
वेळी अवेळी उगाच पडझड होते
शांत मनातील आठवण ढवळून जाते
कोणाशी पुसावे नी कोणावर रुसावे ,
मनात सतत सुटलेल्या क्षणांशी दावे
कोपऱ्यात शांत पडून असताना
स्पंदनांना साथ दबक्या हुंदक्यांची
मनाच्या घुसमटतीत प्राण द्यावे त्यागून
ही आस असते अव्हेरल्या देहाची
कानावर पडणारे जलथेंब कधी
मोत्यांच्या मनमोहक होत्या सरी
आता मात्र बंद मनात केवळ नी
केवळ एकलेपणावर आठव आरी
सगळे सगळे वाहून जाताना
मनात का कित्ती साठून राहते ,
कितीदा द्यावी सोडून मोहाची नौका ,तरी
पुन्हा पुन्हा देहकिनाऱ्यावरच डोलते
पल्लवी फडणीस,भोर✍️
©Pallavi Phadnis
#sad_shayari