अवखळ अल्लड पाऊस कित्ती
प्रेमळ असतो ,येताना कसे
स्पंदनांचे ढग दाटून येतात
स्पर्शाचा उबऱ्याने सैल होतात
सैलावलेल्या थेंबांना काही
बंधनेच नसतात ,उगाच बेफाम
होवून अंगणात नाचतात,थेंब न
कळत थकून धरणीतरंगाला भेटतात
काही लबाड थेंब कधी अळवावर
कधी फुलावर कधी कळीवर डोलतात
काही थेंब तर त्या लाजूळवर भाळतात
ते बुजरेपान अलगद लाजून पर्णपदरात लपतात
असा अल्लड अवखळ पाऊस
कधी उनाड ,बेफाम ,कधी लाजरा
असतो ,पण काय बोलावे आता
ह्याच्या येण्यानेच तरंगसाजन भेटतो
पल्लवी फडणीस,भोर✍🏻
©Pallavi Phadnis
#Droplet