Sign in
Archana Pol

Archana Pol

  • Latest
  • Popular
  • Video

शब्दावाचुन कळले सारे प्रेमरंग ते व्याकुळले भाव बोलके झाले सारे नजरेमधुनी बघताना आठवते का तुला सख्या रे कविता ओली स्फुरताना सांज धुनीचे क्षण आठवले आज झुल्यावर झुलताना ©Archana Pol

#मराठीकविता #सांजधून #togetherforever  शब्दावाचुन कळले सारे
  प्रेमरंग ते व्याकुळले
भाव बोलके झाले सारे 
नजरेमधुनी बघताना

आठवते का तुला सख्या रे
 कविता ओली स्फुरताना
सांज धुनीचे  क्षण आठवले 
आज झुल्यावर झुलताना

©Archana Pol

असं म्हणतात, ज्या ठिकाणी अपमान होतो अशा ठिकाणी क्षणभरही राहू नये.. स्त्रीला आयुष्यभर तिथेच रहावं लागतं.. ज्या ठिकाणी ती वारंवार अपमानित होते.. ©Archana Pol

#मराठीविचार  असं म्हणतात,
 ज्या ठिकाणी अपमान होतो 
अशा ठिकाणी क्षणभरही राहू नये.. 
 स्त्रीला आयुष्यभर तिथेच रहावं लागतं.. 
 ज्या  ठिकाणी ती वारंवार अपमानित होते..

©Archana Pol

विचार

10 Love

गुरु भवतारक जगदोद्धारक गुरु तेजस्वी अखंड पावक. गुरु सुखकारक दुःखनिवारक गुरु उपदेशक अविचल साधक. गुरु बोधामृत, गुरु परिवर्तक, गुरु निष्ठेचा विनम्र पालक. गुरु तेजस्वी, गुरु परमार्थक, उद्बोधक अन् जीवनदायक. गुरु अभ्यासक, विश्वसुधारक , गुरु उर्जेचा अखंड प्रेरक. वात्सल्याचे मुर्तीरुप गुरु, गुरू नभीचा शीतल स्त्रावक. गुरु अधिनायक, विघ्नविनाषक, गुरु ओजस्वी पायसदायक. गुरु ज्ञानामृत, अथांग सागर, जिज्ञासू अन् शांत निरूपक. गुरू प्रेरणा, गुरू चेतना, गुरूबळाची नित्य कामना. गुरू दर्शने विरे वासना लाभते मना शांत चेतना. गुरू दाविती मार्ग शुभंकर गुरुमंत्राचे अखंड चिंतन. गुरुमाऊली द्यावी सद्गति स्वामी भुपती हीच प्रार्थना. ©Archana Pol

#मराठीकविता  गुरु भवतारक जगदोद्धारक गुरु तेजस्वी अखंड पावक.
गुरु सुखकारक दुःखनिवारक गुरु उपदेशक अविचल साधक. 
गुरु बोधामृत, गुरु परिवर्तक, गुरु निष्ठेचा विनम्र पालक.
गुरु तेजस्वी, गुरु परमार्थक, उद्बोधक अन्
जीवनदायक. 

गुरु अभ्यासक, विश्वसुधारक , गुरु उर्जेचा अखंड प्रेरक.
वात्सल्याचे मुर्तीरुप गुरु, गुरू नभीचा शीतल स्त्रावक.
गुरु अधिनायक, विघ्नविनाषक, गुरु ओजस्वी पायसदायक.
गुरु ज्ञानामृत, अथांग सागर, जिज्ञासू अन्  शांत निरूपक.

गुरू प्रेरणा, गुरू चेतना, गुरूबळाची नित्य 
कामना.
गुरू दर्शने विरे वासना लाभते मना शांत चेतना.
गुरू दाविती मार्ग शुभंकर गुरुमंत्राचे अखंड चिंतन.
गुरुमाऊली द्यावी सद्गति स्वामी भुपती
हीच प्रार्थना.

©Archana Pol

गुरुवंदना

12 Love

भेटीसाठी डोळी | ओथंबले घन | मनात श्रावण | पेरलेला ||१|| आतुरले मन | पाहताना वाट | भिजलेला काठ | मनाचा रे ||२|| श्वासांचा आवेग | उसासला जीव | लागे ना रे ठाव | काळजाचा ||३|| बरसल्या धारा | गंधाळली माती | शहारली पाती | चिंब ओली ||४|| गंधाळ गंधाळ | माळरान सारे | मखमली वारे | भोवताली ||५|| तरारली राने | चिंब ओली मने | रुजलेले गाणे | रानी वनी ||६|| अंकुरला कोंब | धरित्रीच्या पोटी | मोहरली सृष्टी | आनंदाने ||७|| पालव स्पर्शाने | आनंदी अंगण | नभाचे हे ऋण | कसे फेडू? ||८|| ©Archana Pol

#मराठीकविता #ऋण  भेटीसाठी डोळी | ओथंबले घन |
मनात श्रावण | पेरलेला  ||१||

आतुरले मन | पाहताना वाट | 
भिजलेला काठ | मनाचा रे ||२||

श्वासांचा आवेग | उसासला जीव |
लागे ना रे ठाव | काळजाचा ||३||

बरसल्या धारा | गंधाळली माती |
शहारली पाती | चिंब ओली ||४||

गंधाळ गंधाळ | माळरान सारे |
मखमली वारे | भोवताली ||५||

तरारली राने | चिंब ओली मने |
रुजलेले गाणे | रानी वनी ||६||

अंकुरला कोंब | धरित्रीच्या पोटी |
मोहरली सृष्टी | आनंदाने ||७||

पालव स्पर्शाने | आनंदी अंगण |
नभाचे हे ऋण | कसे फेडू? ||८||

©Archana Pol

#ऋण

12 Love

#मराठीप्रेम #Happychocolateday  उगा शब्दांना घोळवू नकोस चॉकलेटमध्ये 
तुझ्या प्रेमाचा गोडवा जपलाय मी ह्रदयात..

अर्चू..

©Archana Pol
#जीवनअनुभव  ' आई' नावाचा चार्जर..





काही व्यक्ती आपल्यासाठी चार्जरसारख्या असतात..  जेव्हा बॅटरी डाऊन होते. मनामध्ये काहीतरी बिघाड झालाय हे जाणवतं..  आतून तुटून पडल्यासारखं वाटतं.‌. आभाळात झेप घ्यायचीय पण उमेद खचलीय हे जाणवतं.. निगेटिव्हिटीचा व्हायरस वाऱ्यासारखा उधळत असतो.. अनावश्यक ऍप्सचा भरणा झालाय आणि आता सगळं काही हॅंग होणार असं वाटतं.. तेव्हा तेव्हा.. हा चार्जर  अगदी विश्वासानं धावत येतो.. अगदी न बोलवता..

याला नेटपॅकची गरज ना इलेक्ट्रिसिटीची.. या चार्जरची स्वतःचीच पॉवर कॅपॅसिटी प्रचंड आहे..  अगदी हार्ट टू हार्ट कनेक्ट होतो..  सगळ्या निगेटिव्हिटीचा व्हायरस निघून जातो आणि मनाचा फोन अगदी क्लीन होतो..  सगळे कॉन्टॅक्ट क्लिअर होतात, जे नको ते डिलीट होतं..  आपल्याला हवी ती पिक्चर्स पुन्हा एकदा स्वच्छ दिसायला लागतात.. आणि बॅटरी फुल्लचा मेसेज चेहऱ्यावर झळकू लागतो. 

क्यु आर स्कॅन करुन हल्ली सगळं ऑनलाईन मिळतं..  पण स्कॅन करुन आई नाही मिळत.! बाकी सगळं ऑनलाईन मिळेल पण ती आणि तीचं प्रेम ऑनलाईन नाही मिळणार..   ज्याच्याजवळ हा चार्जर आहे त्यांनी जीवापाड सांभाळा हं हा चार्जर.. एकदा हरवला ना.. की करोडो देऊनही नाही मिळणार परत.. 

तुमच्याकडे आहे का असा लाईफटाईम चार्जर??

©Archana Pol

चार्जर

171 View

Trending Topic