English
मैत्रीण जवळची तुला मानले होते ते निभावले मी मनापासुनी नाते नेहमी तुझ्या मी मदतीसाठी आलो मग सांग कुठे मी चुकलो का तुझे वागणे सतत बदलते आहे हा अबोला तुझा मला खटकतो आहे मोकळेपणाने विचार ये तू सारे ते प्रश्न तुला पडणारे म्हणतेस जरी विश्वास तुझ्यावर आहे मग मनी तरीही शंका कसली आहे मी सांगत आलो तुलाच सगळे काही काहीच लपवले नाही ये बोलू आपण दोघे शांतपणाने होईल मळभ बघ दूर मनीचे त्याने काळजी सखे मज तुझी वाटते आहे तू सांग खरे जे आहे शंकेला नात्यामध्ये स्थान नसावे विश्वासाचे कोंदण नात्यास मिळावे संवाद मोकळा दोघांमध्ये व्हावा नात्यात गोडवा यावा ©जितू
जितू
14 Love
White छोटेसे हे गाव आमचे नदीकिनारी वसलेले सभोवताली लक्ष ठेवण्या डोंगर असती बसलेले सायंकाळी नदीकिनारी आवडते मज फिरायला जाउन तेथे जरा एकटे झाडाखाली बसायला नसतो कोलाहल कुठलाही शांत वाटते खूप इथे अनेक वेळा डोळे मिटुनी बसुन राहतो मीच तिथे कानावरती पडतो केवळ खळखळाट त्या पाण्याचा सुखद वाटतो थंडगार मज स्पर्श वाहत्या वाऱ्याचा अंतर थोडे चालुन जाता मंदिर आहे स्वामींचे सायंकाळी तिथे चालते कीर्तन त्यांच्या नामाचे रोज आरती असते तेथे मेळा जमतो भक्तांचा ऐकू येतो नाद दूरवर मंदिरातल्या घंटांचा सुंदर दिसतो परिसर सारा मावळतीच्या किरणांनी किती वेळ मी पहात बसतो दृश्य मनोहर नयनांनी एक वेगळी गूढ आर्तता मनास माझ्या सुखावते पुन्हा पुन्हा येण्यास इथे मन मलाच माझे खुणावते ©जितू
15 Love
झाली होती पडझड शाळेच्या वास्तूची इमारत जुनी काल पाडली शाळेची उरलेले आहे मागे शाळेचेच जोते आठवता शाळा पाणी डोळ्यामध्ये येते पहिल्यांदा शाळेमध्ये आलो होतो जेव्हा मनामध्ये भीती थोडी होती माझ्या तेव्हा रुळलो नंतर आम्ही शाळेमध्ये सारे सवंगडी नवे माझे हळूहळू झाले शिकवले शिक्षकांनी आम्हा खूप छान किती विषयांचे त्यांनी दिले आम्हा ज्ञान वर्गातल्या सगळ्यांशी गट्टी माझी झाली साऱ्यांनी मिळून आम्ही मस्ती खूप केली खेळायचो खेळ आम्ही इथे किती न्यारे वाटून खायचो येथे डबे आम्ही सारे अशा खूप आठवणी शाळेच्या आहेत मन माझे हरवते गोड त्या क्षणात एकदा वाटते पुन्हा लहान मी व्हावे मित्र मैत्रिणीं सोबत शाळेमध्ये जावे मधल्या सुट्टीत कुल्फी चिंचा पेरू खावे सोनेरी ते क्षण थोडे फिरुनी जगावे ©जितू
11 Love
12 Love
White जीवमात्र हे जन्मती इथे भोगण्या भोग देह मिळाला मानवी हा दुर्लभ संयोग कर्म करावे चांगले असो अंतरी भाव कधी नसावे अंतरी स्वार्थ अहंता हाव मानव होतो आंधळा स्वार्थ वाढता फार पूर्ण कराया वासना करतो मग अविचार अविचाराने नासते कृती वाढतो राग फणा काढुनी डोलतो मग द्वेषाचा नाग नको व्हायला वासना मनातल्या शिरजोर उपाय गेले सांगुनी संत महात्मे थोर अश्व मनाचा साधण्या जरा धिराने वाग प्रेम खरे घे जाणुनी कर थोडा तू त्याग ठेव मनी तू जागता अखंड भक्ती भाव अहंकार दे सोडुनी नको फुकाचा आव कृतज्ञतेची भावना मनी नेहमी ठेव ओळख आता माणसा अंतरातला देव ©जितू
13 Love
शारदे वरदान दे मज शारदे वरदान दे सूर माझे गोड व्हावे एवढे मज दान दे ही तुझी आहे कृपा की गायला जमते मला भाग्य आहे लाभले हे चालतो माझा गळा शब्द स्वर लय ताल यांचे नेमके मज भान दे ज्ञान दिधले मज गुरुंनी वाट त्यांनी दावली त्यामुळे मम संगिताची साधना ही चालली साधनेला यश मिळू दे तू मला स्वरज्ञान दे साधना चालो निरंतर दंभ यावा ना परी नम्रता अंगी असावी लाभली किर्ती जरी दान दे तू मज यशाचे नम्रतेचे वाण दे ©जितू
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here