मैत्रीण जवळची तुला मानले होते ते निभावले मी मनापास | मराठी ಕಾವ್ಯ

"मैत्रीण जवळची तुला मानले होते ते निभावले मी मनापासुनी नाते नेहमी तुझ्या मी मदतीसाठी आलो मग सांग कुठे मी चुकलो का तुझे वागणे सतत बदलते आहे हा अबोला तुझा मला खटकतो आहे मोकळेपणाने विचार ये तू सारे ते प्रश्न तुला पडणारे म्हणतेस जरी विश्वास तुझ्यावर आहे मग मनी तरीही शंका कसली आहे मी सांगत आलो तुलाच सगळे काही काहीच लपवले नाही ये बोलू आपण दोघे शांतपणाने होईल मळभ बघ दूर मनीचे त्याने काळजी सखे मज तुझी वाटते आहे तू सांग खरे जे आहे शंकेला नात्यामध्ये स्थान नसावे विश्वासाचे कोंदण नात्यास मिळावे संवाद मोकळा दोघांमध्ये व्हावा नात्यात गोडवा यावा ©जितू"

 मैत्रीण जवळची तुला मानले होते
ते निभावले मी मनापासुनी नाते
नेहमी तुझ्या मी मदतीसाठी आलो 
मग सांग कुठे मी चुकलो

का तुझे वागणे सतत बदलते आहे 
हा अबोला तुझा मला खटकतो आहे 
मोकळेपणाने विचार ये तू सारे 
ते प्रश्न तुला पडणारे

म्हणतेस जरी विश्वास तुझ्यावर आहे 
मग मनी तरीही शंका कसली आहे 
मी सांगत आलो तुलाच सगळे काही 
काहीच लपवले नाही

ये बोलू आपण दोघे शांतपणाने 
होईल मळभ बघ दूर मनीचे त्याने
काळजी सखे मज तुझी वाटते आहे 
तू सांग खरे जे आहे

शंकेला नात्यामध्ये स्थान नसावे
विश्वासाचे कोंदण नात्यास मिळावे
संवाद मोकळा दोघांमध्ये व्हावा 
नात्यात गोडवा यावा

©जितू

मैत्रीण जवळची तुला मानले होते ते निभावले मी मनापासुनी नाते नेहमी तुझ्या मी मदतीसाठी आलो मग सांग कुठे मी चुकलो का तुझे वागणे सतत बदलते आहे हा अबोला तुझा मला खटकतो आहे मोकळेपणाने विचार ये तू सारे ते प्रश्न तुला पडणारे म्हणतेस जरी विश्वास तुझ्यावर आहे मग मनी तरीही शंका कसली आहे मी सांगत आलो तुलाच सगळे काही काहीच लपवले नाही ये बोलू आपण दोघे शांतपणाने होईल मळभ बघ दूर मनीचे त्याने काळजी सखे मज तुझी वाटते आहे तू सांग खरे जे आहे शंकेला नात्यामध्ये स्थान नसावे विश्वासाचे कोंदण नात्यास मिळावे संवाद मोकळा दोघांमध्ये व्हावा नात्यात गोडवा यावा ©जितू

#TereHaathMein

People who shared love close

More like this

Trending Topic