झाली होती पडझड शाळेच्या वास्तूची इमारत जुनी काल पा | मराठी Poetry

"झाली होती पडझड शाळेच्या वास्तूची इमारत जुनी काल पाडली शाळेची उरलेले आहे मागे शाळेचेच जोते आठवता शाळा पाणी डोळ्यामध्ये येते पहिल्यांदा शाळेमध्ये आलो होतो जेव्हा मनामध्ये भीती थोडी होती माझ्या तेव्हा रुळलो नंतर आम्ही शाळेमध्ये सारे सवंगडी नवे माझे हळूहळू झाले शिकवले शिक्षकांनी आम्हा खूप छान किती विषयांचे त्यांनी दिले आम्हा ज्ञान वर्गातल्या सगळ्यांशी गट्टी माझी झाली साऱ्यांनी मिळून आम्ही मस्ती खूप केली खेळायचो खेळ आम्ही इथे किती न्यारे वाटून खायचो येथे डबे आम्ही सारे अशा खूप आठवणी शाळेच्या आहेत मन माझे हरवते गोड त्या क्षणात एकदा वाटते पुन्हा लहान मी व्हावे मित्र मैत्रिणीं सोबत शाळेमध्ये जावे मधल्या सुट्टीत कुल्फी चिंचा पेरू खावे सोनेरी ते क्षण थोडे फिरुनी जगावे ©जितू"

 झाली होती पडझड शाळेच्या वास्तूची
इमारत जुनी काल पाडली शाळेची
उरलेले आहे मागे शाळेचेच जोते 
आठवता शाळा पाणी डोळ्यामध्ये येते

पहिल्यांदा शाळेमध्ये आलो होतो जेव्हा 
मनामध्ये भीती थोडी होती माझ्या तेव्हा
रुळलो नंतर आम्ही शाळेमध्ये सारे 
सवंगडी नवे माझे हळूहळू झाले 

शिकवले शिक्षकांनी आम्हा खूप छान 
किती विषयांचे त्यांनी दिले आम्हा ज्ञान
वर्गातल्या सगळ्यांशी गट्टी माझी झाली 
साऱ्यांनी मिळून आम्ही मस्ती खूप केली 

खेळायचो खेळ आम्ही इथे किती न्यारे 
वाटून खायचो येथे डबे आम्ही सारे
अशा खूप आठवणी शाळेच्या आहेत 
मन माझे हरवते गोड त्या क्षणात

एकदा वाटते पुन्हा लहान मी व्हावे 
मित्र मैत्रिणीं सोबत शाळेमध्ये जावे 
मधल्या सुट्टीत कुल्फी चिंचा पेरू खावे
सोनेरी ते क्षण थोडे फिरुनी जगावे

©जितू

झाली होती पडझड शाळेच्या वास्तूची इमारत जुनी काल पाडली शाळेची उरलेले आहे मागे शाळेचेच जोते आठवता शाळा पाणी डोळ्यामध्ये येते पहिल्यांदा शाळेमध्ये आलो होतो जेव्हा मनामध्ये भीती थोडी होती माझ्या तेव्हा रुळलो नंतर आम्ही शाळेमध्ये सारे सवंगडी नवे माझे हळूहळू झाले शिकवले शिक्षकांनी आम्हा खूप छान किती विषयांचे त्यांनी दिले आम्हा ज्ञान वर्गातल्या सगळ्यांशी गट्टी माझी झाली साऱ्यांनी मिळून आम्ही मस्ती खूप केली खेळायचो खेळ आम्ही इथे किती न्यारे वाटून खायचो येथे डबे आम्ही सारे अशा खूप आठवणी शाळेच्या आहेत मन माझे हरवते गोड त्या क्षणात एकदा वाटते पुन्हा लहान मी व्हावे मित्र मैत्रिणीं सोबत शाळेमध्ये जावे मधल्या सुट्टीत कुल्फी चिंचा पेरू खावे सोनेरी ते क्षण थोडे फिरुनी जगावे ©जितू

#good_night

People who shared love close

More like this

Trending Topic