White त्यांचा अचानक आलेला मेसेज मी पहिला,
तू दिपेश ना? असा प्रश्न त्यांनी मला विचारला...
चेहऱ्यावर स्मित हास्य देत एक होकार मी ही हुंकारला,
Hi ने सुरवात झालेला प्रवास आज आपलासा वाटू लागला...
रोज बोलता बोलता बोलण्यात गोडी वाढू लागली,
शब्दांत शब्द गुंफले माणसं आपलीसी वाटू लागली...
ओढ तुमच्या भेटीची एका क्षणात मजला झाली,
बघता बघता मिलनाची वेळ जवळ आली...
तसा उशीर थोडा मज कडूनच झाला,
वेळेच्या आधी येऊन त्यांनी माझाच रेकॉर्ड मोडला...
भेटीसाठी मी त्यांना पहिल्यांदाच कॉल केला,
तो गोड आवाज मनाला मंत्रमुग्ध करून गेला...
आता वेळ झाली की आपोआप मन वळू लागते,
न सांगताच मन माझे तुमच्या मेसेज बॉक्स मध्ये धावते...
मराठी-इंग्लिश ची जुगलबंदी ने बोलणे सुरू होते,
आपलेपणाच्या या बोलण्याने मन माझे आनंदाने डोलते...
कसं बोलू धन्यवाद तुम्हाला, कसे मानू आभार,
तुमच्या आपलेपणाच्या शब्दांनी, वाटतो मनाला आधार...
-Mr. Gulekar
०३/१०/२०२४
.
©Dipesh Gulekar
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here