White तुला समजलोच नाही ग मी,
की तू मला समजूनच नाही घेतलंस...
मान्य, की ओरडत होतो मी तुला,
तेव्हा माझ्या नजरेत का नाही पाहिलंस...
मी करत असलेल्या काळजीत,
माझ्या डोळ्यातलं प्रेमच नाही बघितलंस...
दिसला तो फक्त राग माझा,
त्याविषयी एकदाही का नाही विचारलंस...
खरंच मी तुला समजलोच नाही,
की तू मला समजूनच नाही घेतलंस....!
- अव्यक्त शब्द ✍️
.
©Dipesh Gulekar
#good_night